चोरी प्रकरण : नऊ दिवसात पोलिसांनी स्पॉटही बघितला नाही

नागपूर :- शहरांतर्गत येणाऱ्या हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीतील बनवाडी येथील अशोक शेवडे यांच्या शेतातील घराचे कुलूप तोडून पन्नास हजाराचा माल चोरून नेणाऱ्या घटनेला नऊ दिवस होऊनही पोलीस अजून पर्यंत स्पॉट बघायला आलेले नाहीत.

बनवाडी हे गाव मानेवाडा पासून दक्षिणेस 12 किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्यावर आहे. अशोक शेवडे यांनी शेतात वस्तू ठेवण्याच्या दृष्टीने घराचे बांधकाम केले. चोरट्याने त्या घराचा टाला तोडून मोटार पंप, झटका मशीन, टिल्लू पंप, वायरचे बंडल आदी असा जवळपास 50 हजाराचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला.

त्याची लेखी तक्रार अशोक शेवडे यांनी स्वतः 6 फेब्रुवारीला हिंगणा पोलीस स्टेशन येथे जाऊन दिली. परंतु आजपर्यंत पोलिसांनी त्या स्पॉटवर येऊन साधी चौकशीही केली नाही. त्यामुळे शेतमालक अशोक शेवडे यांच्या त्या घरातील सामान आजही अस्ताव्यस्त पडलेले आहे.

पोलीस जोपर्यंत येऊन पंचनामा करत नाही तोपर्यंत त्याची विल्हेवाट सुद्धा करता येत नाही. पोलिसांनी विनाविलंब येऊन चौकशी करून, त्या चोराला जेरबंद करावे अशी मागणी अशोक शेवडे यांनी केलेली आहे. अशोक शेवडे हे बसपा नेते उत्तम शेवडे यांचे मोठे भाऊ होत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधान 16 फेब्रुवारीला ‘विकसित भारत विकसित राजस्थान’ या कार्यक्रमाला करणार संबोधित

Thu Feb 15 , 2024
  – पंतप्रधान राजस्थानमध्ये 17,000 कोटी रुपये खर्चाच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन ,लोकार्पण आणि पायाभरणी करणार – रस्ते, रेल्वे, सौर ऊर्जा, वीज पारेषण, पेयजल आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील प्रकल्पांचा यात समावेश – या प्रकल्पांच्या शुभारंभातून राजस्थानच्या पायाभूत सुविधांच्या परिदृश्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी तसेच वृद्धी आणि विकासाच्या संधी निर्माण करण्याचे पंतप्रधानांचे अथक प्रयत्न अधोरेखित नवी दिल्ली :- पंतप्रधान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!