संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बस स्टँड चौकातील सुरेश किराणा स्टोर्स नामक कुलूपबंद दुकानातून अज्ञात चोरट्याने काल मध्यरात्री दुकानाचे शटर तोडून दुकानात अवैधरित्या प्रवेश करून गल्ल्यात सुरक्षित ठेवून असलेले नगदी 8 हजार रुपये व इतर साहित्य चोरून नेल्याची घटना आज सकाळी 8 वाजता निदर्शनास आली.यासंदर्भात फिर्यादी शेखर चावला वय 38 वर्षे रा कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.