नक्षलग्रस्त पोलिसांना मिळणार दीडपट वेतना सोबत मिळणार महागाई भत्ता..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

महाविकास आघाडी सरकारने केले होते बंद!

उपमुख्यमंत्री यांनी घेतली आमदार परिणय फुके यांच्या पत्राची दखल…

गोंदिया :- नक्षलग्रस्थ जिल्ह्यात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना दीडपट वेतन आणि महागाई भत्ता मिळावा यासाठी आमदार परिणय फुके यांनी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले. असुन याची दखल उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असुन त्यावर शासन आदेश काढला असुन आता पोलीस कर्मचाऱ्यांना दीडपट वेतन आणि महागाई भत्ता मिळणार आहे.

नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात जीव धोक्यात घालुन कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस विभागातील कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस विभागातील कर्तव्य दक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांना २०११ पासून नक्षलविरोधी मोहिमेसाठी दीडपट पगार दिला जात होता, मात्र एप्रिल २०२१ पासून तो जरी न करता मागील महाविआच्या सरकारने दीडपट पगार बंद करून त्यांचे मनोधैर्य खचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र २४ सप्टेंबर २०२२ रोजी सत्तेत आलेल्या शिंदे- फडणवीस सरकार मध्ये गोंदिया-भंडारा विधानपरिषद क्षेत्राचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी नक्षलग्रस्थ असा संवेदनशील गोंदिया जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचा या गंभीर प्रकरणाची दाखल घेत उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृह मंत्री देवेंद फडणवीस यांना पत्र लिहून गोंदिया जिल्ह्यातील पोलिसाना देखील दीड पट वेतन व भत्ता देण्यात यावा अशी मागणी केली होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पोरवाल महाविद्यालयात "इतिहास अभ्यास मंडळ"च्या कार्यकारिणीचे गठन..

Thu Oct 20 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी : स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील इतिहास विभागाद्वारा शैक्षणिक सत्र २०२२-२०२३ करीता “इतिहास अभ्यास मंडळ”च्या कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. याप्रसंगी इतिहास विभाग प्रमुख व कार्यकारिणीचे समन्वयक डॉ.जितेंद्र सावजी तागडे यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात प्रत्येक शैक्षणिक सत्रात कार्यकारिणी गठन करून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबतच नवनवीन उपक्रमांद्वारे इतिहास विषयात आवड निर्माण करण्याचा उद्देश्य स्पष्ट केला. कार्यक्रमाचे उद्घाटक, वक्ता व प्रमुख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights