रेशीम संचालनालयाची गट-क व गट-ड संवर्गातील भरती प्रक्रिया रद्द

मुंबई :- रेशीम संचालनालयाने जाहिरात क्रमांक ०१/२०२० नुसार दि. १३ मार्च २०२० अन्वये गट-क व गट-ड संवर्गातील अनुसूचित जमाती या प्रवर्गातील वरिष्ठ तांत्रिक सहायक-२ व प्रयोगशाळा परिचर-१ सरळसेवेची पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्याकरीता दि. १३ मार्च २०२० रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. ही भरती प्रक्रिया कोवीड २०१९ व प्रशासकीय कारणामुळे राबविण्यात आली नाही. रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील १२४ रिक्त असलेली पदे भरण्याचे प्रस्तावित आहे. या रिक्त पदांमध्ये वरील जाहिराती मधील अनुसूचित जमाती प्रवर्गाचे पदे समाविष्ठ असल्याने जाहिरात क्रमांक ०१/२०२० दि. १३ मार्च २०२० अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली भरती पक्रिया रद्द करण्यात येत आहे असे नागपूर येथील रेशीम संचालक गोरक्ष गाडीलकर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

NewsToday24x7

Next Post

नमो महारोजगार मेळाव्यात 5 हजार 46 तरुणांना मिळाली नोकरी

Mon Dec 11 , 2023
– आयटी कंपनीत मिळाली सर्वाधिक वार्षिक 10 लाख रुपये पगाराची नोकरी  Your browser does not support HTML5 video. नागपूर :- राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार आणि नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित नमो महारोजगार मेळाव्यात पहिल्या दिवशी एकूण 16 हजार 300 तरुणांनी उपस्थिती दर्शविली. 459 कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. यावेळी 13 हजार 511 मुलाखती घेण्यात आल्या. यातील 5 हजार 46 तरुणांना नोकरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com