प्रेयसीच्या पहिल्या प्रियकराचा युवकाने केला खून

– वाठोड्यातील घटना, तीन आरोपींना अटक

नागपूर :- एका तरुणीचे दोन युवकांशी प्रेमसंबंध होते. पहिल्या प्रियकराने तरुणीला मारहाण करीत तिचा मोबाईल फोडला. त्यामुळे चिडलेल्या तिच्या दुसऱ्या प्रियकराने दोन साथिदारांच्या मदतीने पहिल्या प्रियकराचा चाकूने भोसकून खून केला. ही थरारक घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास वाठोड्यात घडली. रवी गरीबा साव (२७, डब्ल्यूसीएल कॉलनी, सिल्लेवाडा, ता. सावनेर)असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी तीनही आरोपींनी अटक केली.

रवी साव हा खासगी काम करतो आणि त्याचे सक्करदरा परीसरातील १६ वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध आहेत. ती मुलगी अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी असून तिचे आरोपी आवेश मिर्झा बेग रहमत बेग (आदर्शनगर, नंदनवन) याच्याशी प्रेमसंबंध आहे. दोन्ही तरुणांशी तिचे प्रेमसंबंध असल्याने दोघांकडून नेहमी भेटवस्तू घेत होती. रवीने तिला मोबाईल भेट दिला होता. मात्र, तिचा मोबाईल नेहमी व्यस्त दिसत असल्याने त्याला संशय आला. त्याला आवेश बेग या  युवकाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी रवीने प्रेयसीला मारहाण केली आणि तिचा मोबाईल फोडला. नाराज झालेल्या मुलीने आपला दुसरा प्रियकर आवेशला ही बाब सांगितली. त्याचा पारा चढला आणि त्याने रवीचा काटा काढण्याचा कट रचला. बुधवारी रात्रीला आवेशने रवीला फोन करून पांढुर्णाजवळ भेटायला बोलावले. आरोपी आवेश आणि साथिदार कुणाल खळतकर आणि आयुष पेठे हे तेथे पोहचले. काही वेळात रवीसुद्धा तेथे पोहचला. आरोपींनी रवीला कारमध्ये कोंबले आणि आऊटर रिंगरोडवर घेऊन गेले.

प्रेयसीला मारहाण केल्याबाबत आवेशने जाब विचारला. शारीरिक संबंधासाठी नकार दिल्याचे कारण सांगताच आवेश चिडला. तिघांनीही रवीवर चाकूने सपासप वार करीत जागीच ठार केले. शेतात रविचा मृतदेह फेकून आरोपींनी पळ काढला.

गुरुवारी सकाळी रवीचा मृतदेह पांढुर्णा येथील सरपंच व पोलीस पाटील यांना दिसला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अवघ्या चार तासात तिनही आरोपींना अटक केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मानव संसाधन विकास विभाग: लक्ष्य हासिल, अब नए कीर्तिमान के लिए तत्पर

Sat Mar 9 , 2024
नागपूर :- मानव संसाधन विकास विभाग, वेकोलि, उत्तरोत्तर प्रगति की ओर अग्रसर है। इस विभाग ने न केवल वर्ष 2023 -24 का लक्ष्य प्राप्त कर लिया है, बल्कि अनेक नए प्रशिक्षण जैसे साक्षात्कार कौशल, स्ट्रेटेजिक मैनेजमेंट, नैतिकता एवं मूल्य, लैंगिक बजटिंग आदि आयोजित कर विभाग को यश की एक नई ऊंचाई पर स्थापित कर दिया है। मुख्यतः प्रशिक्षण कार्य संपादित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com