यवतमाळच्या कलावंतांनी बनविलेल्या गाण्यावर तरूणाई फिदा

– ग्रामीण भागातील मुलांनी साकारलेले ‘क्यूं आज कल’ गाणे लोकप्रिय

यवतमाळ :- येथील तरूणांनी एकत्र येत बनविलेल्या हिंदी गाण्यांच्या अल्बमवर सध्या तरूणाईच्या उड्या पडत आहेत. स्थानिक कलावंतांनी उपलब्ध साधनांत चित्रित आणि प्रदर्शित केलेला ‘क्यूं आज कल’ हा अल्मब या क्षेत्रात येवू इच्छिणाऱ्या ग्रामीण प्रतिभावंत कलावंतांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

ग्रामीण कलावंतांची तळमळ बघून स्थानिक तुळजा नगरीतील अविनाश घाटे या तरूणाने या अल्बम निर्मितीचे आव्हान पेलले. त्यांना दिव्या भगत यांनी सहकार्य केले. दिव्या म्युझिक मेकर्स यांनी सादर केलेल्या ‘क्यूं आज कल’ या अल्बममधील हिंदी गाण्यावर सध्या तरूणाई फिदा झाली आहे.यातील सर्व कलावंत यवतमाळ, पुसद परिसरातील आहेत. या अल्बममधील गाण्याचे चित्रीकरण यवतमाळसह पुसद, नागपूर परिसरात झाले. सामाजिक कार्यातून फुललेली हळवी प्रेमकथा अशा आशयाचे या अल्बममधील कथानक आहे.

दिव्या भगत हिचीच संकल्पना आणि दिग्दर्शन असलेल्या या अल्बममध्ये दिव्यासह कार्तिक कोळपे याने अभिनय केला आहे. गीत सचिन हाके याचे असून, अमन सोनी हा संगीतकार आहे, तर सीएनयु बीट्सचे संगीत आहे. आर. कौशल आणि दिव्या मल्लिका यांनी हे बहारदार गाणे गायले आहे. अरूण कौलगुरू यांनी छाया दिग्दर्शन केले. येथील नंददीप फाऊंडेशनचेही या अल्बमसाठी सहकार्य मिळाले आहे. ‘क्यूं आज कल’ या अल्बमला यु-ट्युबवर तरूणाईकडून प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. त्यामुळे या ग्रामीण कलावंतांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर होणार देशाचे ‘लॉजिस्टिक कॅपिटल’- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विश्वास

Fri Mar 15 , 2024
– सिंदी रेल्वे येथील मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्कचे उद्घाटन – रेल्वे टर्मिनल सेवेच्या चाचणीला हिरवी झेंडी नागपूर :- सिंदी रेल्वे हा भौगोलिकदृष्ट्या वर्धा जिल्ह्याचा भाग असला तरी त्याला नागपूरपेक्षा वेगळे मानत नाही. त्यामुळे नागपूरमधील उद्योगांना सिंदी ड्राय पोर्टशी जोडून मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या काळात नागपूर हे देशाचे ‘लॉजिस्टिक कॅपिटल’ म्हणून नावारुपाला आलेले असेल, असा विश्वास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com