चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिका अनुकंपा धारकांना सुचित करण्यात येते की,चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील मंजुर आकृतीबंधानुसार शासन नियमानुसार रिक्त असलेली पदे नामनिर्देशनाद्वारे अनुकंपा उमेदवारांमधुन भरण्याबाबत चंद्रपूर शहर महानगरपालिका विचाराधीन असल्याने दिनांक १ जानेवारी २०२२ चे तारखेवर आधारीत पात्र / अपात्र अनुकंपा धारकांची प्राथमीक स्वरूपाची प्रतीक्षा यादी महानगरपालिकेच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली असुन याबाबत काही आक्षेप असल्यास आक्षेप नोंदविण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
सदर यादीबाबत अनुकंपा धारकांना काही आक्षेप असल्यास १५ दिवसांचे आत आपला आक्षेप लिखित स्वरूपात योग्य पुराव्यासह महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागात नोंदविता येणार आहे. मुदतीत आक्षेप प्राप्त न झाल्यास अंतिम स्वरूपाची यादी कायम करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.