शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीतांना कोर्टातुन शिक्षा

कोंढाळी :- फिर्यादी नामे – पोशि/९९४ पन्नालाल नंदलाल बटाउवाले पो.स्टे. कोंढाळी यांच्या रिपोर्ट वरुन पो. स्टे. कोंढाळी येथे अप. क्र. १५९/१८ कलम ३५३, ३३२, ३३३, ३२६, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ख) भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.

यातील फिर्यादी व इतर स्टाफ हे पोलीस ठाणे येथे हजर असतांना माहिती मिळाली की, वर्धा रोडवरील पल्टी झालेल्या दारूच्या गाडीतील काही माल वर्धा रोडवरील सायखोड परिसरात काही व्यक्तीकडे आरोपीतांनी आणुन ठेवले आहे. सदर माहितीची शाहानिशा करणेकामी फिर्यादी हे स्टाफसह मोटरसायकलने रवाना होवुन वर्धाफाटा येथुन आरोपी क्र. १० याचे दुकानासमोर फिर्यादी यांनी आपली मोटरसायकल उभी करून मुखवीर लावुन सदर माहितीची शाहानिशा करणेकरीता फिर्यादी व स्टाफ वर्धा फाटाकडे गेले, तसेच फिर्यादी व स्टाफ हे सायखोड मध्ये जाणा-या गल्लीत माहिती घेत असता तेथे नमुद आरोपी नामे- १) शेख शरीफ शेख अजीज वय ४४ वर्ष, रा. कोंढाळी २) सरफराज शेख जब्बार शेख २२ वर्ष, रा. कोंढाळी ३) शेख इकबाल शेख सत्तार वय ३३ वर्ष, रा. कोंढाळी ४) शेख जाहिद शेख समदानी वय ३१ वर्ष रा. कोंढाळी ५) मोहम्मद साईद शेख अजीज वय ३१ वर्ष रा. कोंढाळी ६) शेख रशीद शेख अजीज वय ६६ वर्ष रा. कोंढाळी ७) शेख मुक्तार शेख सत्तार वय ३९ वर्ष रा. कोंढाळी ८) सलमान शेख नफार शेख वय २० वर्ष रा. कोंढाळी ९) सुरज उर्फ भोटु राउत रमेश राउत वय २२ वर्ष रा. कोंढाळी १०) शेख गफार शेख भुरू वय ५० वर्ष रा. ५० वर्ष रा. कोंढाळी हे अचानक हातात लाठ्या व दगड घेवुन पोलीसांकडे येवुन त्यांना घेरले व आरोपी क्र. १० याने जोराने ओरडुन “ये पोलीसवाले हमारे मोहल्ले में पुचताछ के लिये कैसे आये । ईन्होने सब धंदे बंद कर दिए मेरे पे जुझे की रेड कर क्लब कल बंद कर दिया। अभी अपने मोहल्ले में दारू के बारे मे पुचताछ कर रहे है। इन्हें ऐसा सबक सिखाओ कि, दुवारा ये अपने पे कारवाई करने की हिंमत ना कर पाए । असे म्हणुन मारो सालो को खतम कर दो” असे म्हणून आरोपीतांनी लाठ्या व काठ्यांनी तसेच दगडांनी मारहान करून जिवाने मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले व शासकिय कर्मचाrयावर हमला करून शासकिय कामात अडथळा निर्माण केला.

सदर प्रकरणाचे तपास सपोनि पुरुषोत्तम अहीरकर यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. न्यायाधीश भोसले जिल्हा न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय क्र. १० कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक ०८/०२/२०२४ रोजी मा. न्यायाधीश भोसले जिल्हा न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय क्र. १० यांनी वरील नमुद आरोपीतांना सदर गुन्हयात १) कलम १४३, १४९ भादवि मध्ये ३ महिने सश्रम कारावास २) कलम १४७, १४९ भादवि. मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व १०००/- रू. दंड, दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावास ३) कलम १४८, १४९ भादवि. मध्ये १ वर्ष व ६ महिने सश्रम कारावास व १०००/- रु. दंड, दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावास ४) कलम ३५३, १४९ भादवि., मध्ये २ वर्ष ६ महिने सश्रम कारावास व ३०००/- रू. दंड, दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास ५) कलम ३२३, १४९ भादवि मध्ये ६ महिने सश्रम कारावास व ५००/- रू. दंड, दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावास ६) कलम ३३२, १४९ भादवि मध्ये १ वर्ष ६ महिने सश्रम कारावास व १०००/- रु. दंड, दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.

सरकारचे वतीने एपीपी शेंद्र साो यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन नापोशि पवन येवतकर पो.स्टे. कोंढाळी यांनी मदत केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर ग्रामीण पोलीसांनी अवैध्य गोवंश वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप वाहन पकडून एकूण १२ गोवंश यांना दिले जिवनदान

Fri Feb 9 , 2024
नागपूर :-पोलीस स्टेशन कुही येथील स्टाफ यांना गोपनिय मुखबीरद्वारे माहीती मिळाली की, बोलेरो पिकअप वाहन क्र. MH-32/Q-6554 वाहना मध्ये अवैधरित्या प्राणी डांबून गोवंश जातीचे जनावरे कत्तलीकरीता मौजा हळदगाव येथुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून दि. ०८/०२/२०२४ रोजी चे ०२/०० वा. पोलीस स्टेशन कुही येवील स्टाफ व पोलीस अधिक्षक यांचे विशेष पथक हे शासकीय वाहनाने मौजा हळदगाव फाटा येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com