रामटेक :- वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय रामटेक अंतर्गत येणाऱ्या मौजा खंडाळा ( चाचेर ) येथे गावठी कुत्र्यांनी एका काळविटाच्या पिल्लुवर हल्ला चढविला. दरम्यान विकास वाघमारे नामक व्यक्तीने कुत्र्यांच्या तावडीमधुन त्या पिल्लुला वाचविले व वनपरीक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी कळविले. भगत यांनी रेस्क्यु टिम पाठवून काळविटाच्या पिल्लु ला ताब्यात घेवुन रामटेक च्या वनविभागात देखरेखीखाली ठेवले.