नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय, पहिल्या पसंतीक्रमाच्या प्रथम फेरीतच विजयी

नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीक्रमाच्या प्रथम फेरीतच सर्वाधिक १६ हजार ७०० मत मिळवून अपक्ष उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी रात्री ८.०० वाजता श्री अडबाले यांना प्रमाणपत्र देवून विजयी उमेदवार म्हणून घोषित केले.

आज सायंकाळी ६.१५ वाजता डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी पहिल्या पसंतीच्या ३४ हजार ३६० मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्याची घोषणा करत उमेदवारांना प्राप्त मतांची माहिती दिली. विजयी उमेदवारासाठी १६ हजार ४७३ मतांचा कोटा ठरविण्यात आला होता. सुधाकर अडबाले यांनी निश्चित कोट्यापेक्षा २२७ मते अधिक प्राप्त केली.त्यांना १६ हजार ७०० मत प्राप्‍त झाली आहेत.

तत्पूर्वी, आज सकाळी ८ वाजता पासून अजनी येथील मेडीकल रोडवर स्थित समुदाय भवनात पहिल्या पसंतीच्या मतासाठी मतमोजणी सुरू होऊन दुपारी ३.२५ वाजेपर्यंत एकूण ३४ हजार ३६० मत पत्रिकांपैकी २८ हजार मतपत्रिकांची मोजणी झाली. त्यानंतर दुपारी ३.२५ वाजता पासून उर्वरित ६ हजार ३६० मतपत्रिकांची मोजणी सुरू झाल्याचे डॉ. बिदरी यांनी सांगितले. एकूण मतमोजणी नतंर ३२ हजार ९४५ मत वैध ठरली तर १ हजार ४१५ मत अवैध ठरल्याचे त्यांनी सांगितले.

मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने डॉ. बिदरी यांनी सुधाकर अडबाले यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले.

यावेळी निवडणूक निरिक्षक अरुण उन्हाळे, नागपूरचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मिना, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आणि उपायुक्त तथा सहायक निवडणूक अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.

वैध ठरलेल्या मतांपैकी एकूण २२ उमेदवारांना प्राप्त पहिल्या पसंतीचे मते पुढील प्रमाणे.

१)सतीश जगताप (महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष ) : ५१४

२))प्रा.दीपकुमार खोब्रागडे (वंचित बहुजन आघाडी पक्ष) : ३७३

३) देवेंद्र वानखडे (आम आदमी पक्ष) : ८६३

४) राजेंद्र झाडे (समाजवादी पक्ष) (युनायटेड ) : ३३५८

५)अजय भोयर (अपक्ष) : १२०८

६) सुधाकर अडबाले (अपक्ष) : १६७००

७) सतिश इटकेलवार (अपक्ष) :८९

८) बाबाराव उरकुडे (अपक्ष) : ८७

९) नागो गाणार (अपक्ष) : ८२११

१०) रामराव चव्हाण (अपक्ष ): १२

११) रवींद्रदादा डोंगरदेव (अपक्ष) : ४३३

१२) नरेश पिल्ले (विश्व हिंदू जनसत्ता बहुमत पक्ष) : १४

१३) निमा रंगारी (बहुजन समाज पक्ष) : ६६

१४) नरेंद्र पिपरे (अपक्ष) : ५२१

१५) प्रा. प्रवीण गिरडकर (अपक्ष) : ५५

१६) इंजिनिअर प्रो. सुषमा भड (अपक्ष): ८०

१७) राजेंद्र बागडे (अपक्ष) : ५४

१८) डॉ.विनोद राऊत (अपक्ष): ५९

१९) उत्तमप्रकाश शहारे (अपक्ष): ७३

२०) श्रीधर साळवे (अपक्ष): ९

२१) प्रा सचिन काळबांडे (अपक्ष): ९२

२२) संजय रंगारी (अपक्ष):७४

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श राष्ट्रीय छात्र सैनिकांनी डोळ्यापुढे ठेवावा - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Fri Feb 3 , 2023
मुंबई : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये राष्ट्रीय छात्र सैनिकांना उत्कृष्ट प्रदर्शन करीत प्रतिष्ठेचे ‘प्रधानमंत्र्यांचे ध्वजनिशाणासह सर्वोत्कृष्ट संचालनालयाचा पुरस्कार पटकावल्याबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रीय छात्रसेनेचा महाराष्ट्रातील छात्र सैनिकांना आज राजभवन येथे बोलावून कौतुकाची थाप दिली. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत पहाटे उठून रात्री उशिरापर्यंत छात्रसैनिकांनी महिनाभर अथक परिश्रम करुन सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल छात्रसैनिकांचे कौतुक करुन छात्रसैनिकांनी छत्रपती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!