शिवसेनातर्फे आंदोलन करण्याच्या निर्देशाचा नगर परिषद ने घेतला धसका

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– संजय नगर चे मोबाईल टॉवर्स हटविण्याचे नगर परिषद ने दिले निर्देश

कामठी :- कामठी तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात विविध कंपन्यांचे टॉवर्स उभारले आहेत त्यानुसार कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या संजय नगर भागातील अवैध टॉवर्स मधून निघणाऱ्या उच्च लहरींमुळे मानवी शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने टॉवर्स हे मांनववस्तीपासून दूर असावे अशी मागणी शिवसेना कामठीच्या वतीने शिवसेना पदाधिकारी राजन सिंह यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारीला दिलेल्या सामूहिक निवेदनातुन करण्यात आले होते मात्र मुख्याधिकारीने ही बाब गांभीर्याने न घेतल्याने शिवसेना चे कामठी मौदा विधानसभा उपप्रमुख राजन सिंह यांनी पुनश्च नगर परिषद ला निवेदित करून 48 तासात सदर मोबाईल टॉवर न हटविल्यास कामठी नगर परिषद कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निर्देशित केले या निर्देशाचा कामठी नगर परिषद ने धसका घेत संजय नगर येथील मोबाईल टॉवर धारकांना नोटीस बजावून सदर मोबाईल टॉवर 10 दिवसात इतरत्र स्थानांतरण करण्याचे सुचविले.यावर शिवसेना तर्फे करण्यात येणाऱ्या ठिय्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली.

भ्रमणध्वनीच्या कव्हरेज साठी अनेक ठिकाणी टॉवर्स उभारले आहेत हेच टॉवर्स नागरिकासाठी घातक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे या टॉवर्स मार्फतच संबंधित भ्रमणध्वनी कंपणो आपल्या ग्राहकांना सेवा पुरविते त्यातून निघणाऱ्या उच्च लहरींमुळे वातावरणातील प्रदूषण वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होतो सोबतच इतर पशुपक्षी वरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते .केंद्र सरकारने सण 1996 मध्ये नवीन पर्यावरण कायदा अस्तित्वात आणला परंतु या कायद्याची टॉवर्स उभारताना सर्रास पायामल्ली होत असल्याचे दिसून येत आहे.या कायद्यानुसार टॉवर्स उभारनीसाठी काही मार्गदर्शक तत्वे पाळण्याचे बंधन घालण्यात आले आहे.टॉवर्स हे मानवी जीवनाला अपायकारक ठरण्याची शक्यता आहे.अनेक ठिकाणी हे टॉवर्स विजेवर चालतात , वीज नसल्यास डिझेलचा वापर करण्यात येतो त्यातूनही प्रदूषणाला चालना मिळते त्यामुळे भ्रमणध्वनी ही आवश्यक वस्तू झाली असली तरी त्याकडे जागृतत्तेने बघण्याची गरज आहे.

टॉवर्स च्या लहरींमुळे कर्करोग, हृदयरोगाची भितो तसेच डोळ्यांचे व हाडांचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही तशी सूचना विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने वर्तविली आहे.टॉवर्स मधून निघणाऱ्या कीरणोत्सवाच्या लहरींमुळे लहांन मुलांना व्यगत्व, आंधळेपणा ही येण्याची शक्यता असते एकूणच टॉवर्स मांनववस्तीपासून दूर असावेत .टॉवर्स 200 फूट उंच असले तरी त्यातुन निघणाऱ्या उच्च कोरणोत्सर लहरी 200 फूट समांतर जमिनीस सिमेंट कंक्रोट च्या भिंती भेदून आरपार जाऊ शकतात त्यामुळे मानवी शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो तेव्हा कामठी शहरातील संजय नगर येथील अवैध टॉवर त्वरित हटविन्यात यावे अशी मागणी शिवसेना कामठी मौदा विधानसभा च उपजिल्हा प्रमुख राजन सिंह यांनी जागरुक नागरिकांसह कामठी नगर परिषद मख्याधिकारी संदीप बोरकर ला दिलेल्या सामूहिक निवेदनातून करण्यात आले होते यावर गांभीर्याची भूमिका घेत नसल्याने 25 सप्टेंबर ला नगर परिषद ला निवेदन देत 48 तासाचा अल्टीमेंटम देऊन सदर टॉवर न हटविल्यास नगर परिषद समोर आजपासून ठिय्या आंदोलन करणार असल्याचा ईशारा दिलेल्या निवेदनातून करण्यात आला होता मात्र नगर परिषद ने पुकारलेल्या या आंदोलनाच्या निवेदनाची दखल घेत संजय नगर च्या त्या मोबाईल टॉवर हटविण्याचे निर्देशित केले यावर शिवसेना कडून समाधान व्यक्त करत पुकारलेल्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना चे कामठी मौदा विधानसभा उपजिल्हा प्रमुख राजन सिंह, पवन शर्मा (उपजिल्हाप्रमुख युवासेना) रोहित बिल्लरवान, पोनु पिल्ले,नितेश चौहान, नीरू तूप्पट शरद भुशणवार ,राजू तूप्पट ,गणेश सायरे, शुभम तडसे, श्यामली बागड़े, निलेश सोनेकर ,गोलू कडनायके ,सौरभ गुप्ता ,रिषभ उज्जैनवार , सोमू खरे, शिवम मिश्रा ,अमर केजरकर ,चिंटू पिल्ले ,ऋषि जरोंडे,उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस

Wed Sep 27 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दिनांक 25 सप्टेंबर ला श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठी येथे जागतिक फार्मासिस्ट दिवसासह राष्ट्रीय सेवा योजना दिवस सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रेरणेने भरलेल्या उत्साहपूर्ण दिवसाची सुरुवात दीपप्रज्वलनाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांच्या हस्ते झाली. यावेळी विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता प्राध्यापक राधेश्याम लोहिया, रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा मयूर काळे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com