– स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई
मौदा :- मौदा हद्दीत नावकार इन्डस्ट्रीयल अँड लॉजीस्टीक पार्क कंपणीच्या प्रवेशव्दारा जवळ दि. १९/०८/२०२३ रोजी जख्मी अवस्थेत एक युवती पडून असल्याची माहिती मौदा पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत सदर युवतीला मेओ हॉस्पीटल नागपूर येथे उपचाराकरीता दाखल केले. सदर युवतीची चौकशी केली असता पोलीस स्टेशन यशोधरा नगर, नागपूर शहर येथे ती हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली असल्याचे समजले. तसेच ती मतीमंद असल्याची माहिती समोर आली. त्यावरुन मौदा पोलीसांनी पो.स्टे. यशोधरा नगर येथे संपर्क साधून हरविलेली सदर जख्मी मुलीस यशोधरा पोलीसांचे स्वाधीन केले. दि. २०/०८/२०२३ रोजी मेओ हॉस्पीटल येथे उपचारा दरम्यान तिचा मृत्यु झाला. तिच्या मरणाबाबत निश्चीत कारण नसल्याने तिचे वडीलाचे रिपोर्टवरुन अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली. सदर युवतीचे पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये तिचे डोक्याला आतून झालेल्या जखमेमुळे तिचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने अज्ञात आरोपीविरुध्द पो.स्टे. मौदा गुन्हे रजि.नं. ७६३/२०२३ कलम ३०२ भादवि अन्वये खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पोलीस स्टेशन मौदा येथील २ पथके व स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण ०४ विशेष पथके तयार करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यास सुरवात केली. सदर प्रकरणी तांत्रीक तपासादरम्यान इसम नामे १) महेंद्र प्रभाकर मिसार वय ३५ वर्ग रा. हनुमान मंदीर जवळ, खेड तह ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर आणि २) प्रशांत आनंदराव नाकतोडे वय २९ वर्ष, रा. नगपरसोडी, तह. लाखांदूर जि. भंडारा यांना संशयावरुन ताब्यात घेवून गुन्हयासंबंधी विचारपुस त्यांचा सदर गुन्हा केल्याचे आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी के दि. ३०/०८/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहेत.
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान एका आरोपीने मृतक हिचे सोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने आज रोजी नमुद गुन्हयात कलम ३७६ (२) (एल) भा.दं.वि. अन्वये कलम करण्यात आलेली आहे. नमूद दोन्ही आरोपीतांकडे पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान सखोल तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग पुंडलीक भटकर हे करीत आहे.
सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलीक भटकर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरीक्षक, राजीव कर्मलवार, अनिल राऊत, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे पोलीस हवालदार दिनेश आधापूरे, ज्ञानेश्वर राऊत, विनोद काळे, प्रमोद तभाने, मिलींद नांदुरकर, इक्बाल शेख, आशिष भुरे, रजेन्द्र रेवतकर, गजेन्द्र चौधरी, रोशन काळे, अरविंद भगत, पोलीस नायक रोहण डाखोरे, अमृत किन, प्रमोद भोयर, नितेश पिपरोदे, रंजित जाधव, विपीन गायधने, आशिष मुंगळे, किशोर वानखेडे, उमेश फुलवेल, विरेन्द्र नरड, संजय भरोडोया, शंकर मडावी, अभिषेक देशमुख, राहुल सावळे, चालक पोलीस हवालदार अमोल कुठे, पोलीस नायक मुकेश शुक्ला, सुमीत बांगडे, आशुतोष लांजेवार तसेच सायबर सेलचे पोलीस नायक सतिष राठोड यांनी पार पाडली.