शिवशक्तीनगर नं. 2 व 3 च्यावतीने हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

नागपूर :- दक्षिण नपुरातील श्री हनुमान सेवा पंच कमिटी शिवशक्ती नगर नंबर 2 व 3 येथे मंगळवारी नुकत्याच झालेल्या आयोजित कार्यक्रमात सकाळीच पूजा अर्जना, अभिषेक, हनुमान जन्म, भजन व गोपालकाला मोठ्या उत्साहात श्री हनुमान जन्मोत्सव पार पडला. तसेच सायंकाळी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भक्तांनी सहभाग घेतला होता. यशस्वीरित्या सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमात उपस्थित राहून सहकार्य केले आणि वस्तीतील नागरिकांच्या सहकार्याने कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमा प्रसंगी वस्तीतील नागरिकांनी मंदिरात धान्यांच्या स्वरूपात वस्तूही दान दिल्या व मंदिरात देणगीही स्वीकारल्या गेली. शिवशक्ती नगरातील कार्यकर्त्यांनी हनुमान जन्मदिनी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत खुप परिश्रम घेतले. मंदिरातील कार्यकर्ते आणि वस्तीतील नागरिक गणं मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी गिरीश पांडव यांनी भेट दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची माफी मागा! - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शरद पवार यांना आव्हान

Wed Apr 24 , 2024
अमरावती :- अमरावतीच्या भाजपा-महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना पाठिंबा दिल्याबद्दल अमरावतीकरांची माफी मागण्याऐवजी,केंद्रात कृषीमंत्री असूनही शेतकऱ्यांसाठी, विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी काहीच न केल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांची माफी मागून प्रायश्चित्त घ्या, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी अमरावती येथील जाहीर विजय संकल्प सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिले. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा- महायुतीच्या उमेदवार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com