पाचपावली उड्डाणपूल ते पहेलवानशहा दर्गा रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल बांधकामाची मनपा आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर :- नागपूर शहरातील भानखेडा ते लष्करीबाग क्षेत्राला जोडणाऱ्या पाचपावली उड्डाणपूल ते पहेलवानशहा दर्गा रस्त्यावर रेल्वे उड्डाणपूल बांधकामाकरीता खाजगी जमीन संपादित करण्यासाठी बुधवारी (ता.१५) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी मनपा व महारेलच्या अधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणी केली. याप्रसंगी मनपाच्या नगर रचना विभागाचे उपसंचालक प्रमोद गावंडे, महारेलचे ज्येष्ठ महाप्रबंधक डी.आर. टेंभुर्णे, सहायक आयुक्त गणेश राठोड, हरीश राऊत आदी उपस्थित होते.

पाचपावली उड्डाणपूल ते पहेलवानशहा दर्गा रस्त्यावर रेल्वे उड्डाणपूल निर्मितीसाठी काही खाजगी मालमत्तांचे भूसंपादन करण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी आयुक्तांना सांगितले. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ अंतर्गत या रस्त्याची रुंदी २३ मीटर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची परवानगी प्राप्त झाली आहे, अशी माहिती उपसंचालक नगर रचना विभाग यांनी दिली.

या उड्डाणपुलामुळे या भागातील नागरिकांना येण्या-जाण्याच्या दृष्टीने मोठा लाभ होणार आहे. त्यांना थेट कामठी रोड किंवा रेल्वे स्टेशनकडे जाता येईल. यावेळी आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

या प्रसंगी महारेल चे डी.जी.एम. विजय उदापूरे, गांधीबाग झोनचे कार्यकारी अभियंता सचिन रक्षमवार, नगर रचना विभागाचे सहायक अभियंता राजेंद्र जीवतोडे, मनपाचे सुरेश खरे, रोशन जांभुळकर आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बँकांनी पिक कर्जाचे प्राधान्याने वाटप करावे - डॉ.पंकज आशिया

Thu May 16 , 2024
–  खरीप हंगाम पिककर्ज वाटप आढावा यवतमाळ :- खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे बँकांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना प्राधान्याने या हंगामासाठी पिककर्जाचे वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले. महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांकडून पिककर्ज वाटपाचा आढावा घेतले. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला अग्रणी बँक प्रबंधक अमर गजभिये तसेच विविध शासकीय विभाग व बँकांचे अधिकारी राजेश गुर्जर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com