कामठी नगर परिषद च्या कामासंदर्भात नाराजीचा सूर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

-प्लास्टिक बंदीबाबत कामठी नगर परिषदची उदासींनताच,

कारवाही नसल्याने प्लास्टिक वापर वाढले, 

कामठी दी.16 :- शासनाने प्लास्टिक पिशव्या बंदीची अंमलबजावणी केली आहे. देशात प्लास्टिक पिशव्या वापरणारे आणि विकणाऱयांवर दंडात्मक कारवाहीचा आदेश देण्यात आला असून प्लास्टिक पिशवी बंदीची अंमलबजावणी केली जात असली तरी कामठी तालुक्यात मात्र प्लास्टिक पिशव्या चा वापर खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे.

प्लास्टिक पिशव्या मानवी आरोग्यास अपायकारक असल्याने त्यावर कायमस्वरूपी बंदी आणण्याचा कायदा शासनाने पारीत केला होता.प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी आणण्यात आली आहे .प्लास्टिक पिशवी विक्री करणे आणि वापरणे कायद्याने गुन्हा असून त्यासाठी दंडात्मक कारवाही करण्यात येत आहे .संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक पिशविवर कडक निर्बंध आले असताना कामठी तालुक्यात मात्र चोरी छुपे तर कुठे खुलेआम प्लास्टिक पिशव्या उपलब्ध केल्या जात आहेत .भाजीपाला, फळ विक्रेते, किरकोळ विक्री करणारे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे चित्र आहेे. प्लास्टिक पिशव्या वापरावर कडक निर्बंध असताना ही शहरात मात्र प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होताना दिसुन येतो एकदा कारवाही केली म्हणजे झाले असे प्रशासनाला वाटते मात्र कारवाही नंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात असेल तर याला जवाबदार कोण? प्रशासनाने केलेल्या डोळेझाक प्रकारामुळे शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. धडक कारवाही होत नसल्याने व्यापारी विक्रेते, ग्राहक बिनधास्त पने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीतआहेत प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाला स्थानिक नगर परिषद प्रशासनानेच खो दिला असल्याचे दिसून येते .कामठी शहरातील वाढत्या अतिक्रमणच्या समस्ये प्रमाणेच प्लास्टिक बंदीवर रांमबाण उपाय होत नसल्याने कामठी नगर परिषद प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत आहे.

 :- दैनंदिन होणाऱ्या समारंभा मध्ये जेवनवाळीच्या प्रसंगी पर्यावरणाला हानी पोहोचविणारे प्लास्टिक च्या ग्लासंचा वापर खुले आम व मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.कामठी नगर परिषद प्रशासनाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद होण्याच्या दृष्टीने फक्त कारवाही हा एकच मार्गाचा अवलंब न करता नागरिकामध्ये प्लास्टिक चा वापर व त्या संबंधित जनजागृती मोहीम हाती घेण्याची गरज आहे. जो पावेतो विक्रेत्याकडून प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येतील तो पर्यंत ग्राहकांच्या मानसिकतेत बदल होणार नाही.विक्रेता व ग्राहकाकडून प्लास्टिक पिशव्यांची बंदीला प्रतिसाद लाभण्यासाठी जागरूकता निर्माण होण्याची खरी गरज आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्पर्धा परीक्षा व करियर मार्गदर्शन शिबीर..

Sat Sep 17 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  एमपीएससीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार स्पर्धाविषयक साहित्य वाटप गोंदिया :- आपण 25-26 वर्षांचे झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो. मग यश-अपयशाच्या प्रवासात अनेक वर्षे निघून जातात. वय वाढत जाते. एमपीएससी परीक्षेचे तीन टप्पे आहेत. प्रिलीमिनरी, मेन आणि इंटरव्यू यातील कोणत्याही एका टप्प्यात जरी अपयश आले तरी परतपरत पहिल्या टप्प्यावरून सुरुवात करावी लागते. यात एटीकेटी असा प्रकार नसतो. वय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!