-चोरीच्या पैशावर मौजमस्ती
– 35 पैकी 30 हजार खर्च
नागपूर :-त्याच्या जवळ चोरीचा मोबाईल होता. नुकताच त्याने चोरला होता. त्यामुळे मोबाइलवर वारंवार फोन येत होता. रिंगटोन वाजत होती. मात्र, तो फोनला काहीच प्रतिसाद देत नव्हता. संशय येताच तो सहज पोलिसांच्या जाळ्यात अडकला. लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून डोंगरगढ येथे प्रकरण वर्ग करण्यात आले.
अजी कोडीकुंज (42), रा. निलमबेल्ली असे फिर्यादी प्रवाशाचे नाव आहे. ते गाडी क्रमांक 22647 कोचुवेली एक्सप्रेसच्या कोच बी-4 मधून बर्थ क्रमांक 06 वरुन प्रवास करीत होते. ते साखर झोपेत असताना आरोपीने त्यांच्याकडील 18 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरला. फिर्यादीला जाग आल्यावर मोबाईल दिसला नाही. त्यांनी गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानांना सांगितले. लगेच त्यांनी धावत्या गाडीत शोध घेतला. गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर असताना कोच बी-7 मधील एका प्रवाशा जवळील मोबाईलची वारंवार रींगटोन वाजत होती. मात्र, तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. संशयाच्या आधारावर त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बी-4 कोचमधील प्रवाशाचा मोबाईल चोरल्याचे कबूल केले. त्याला नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून डोंगरगढ येथे प्रकरण वर्ग केले.
त्याच प्रमाणे सुमीत बॅन (33), रा. सावनेर हे केळवद रेल्वे स्थानकावर असताना आरोपी अंकीत परतेती (19) ने त्यांच्याजवळील 35 हजार रुपये चोरले. या प्रकरणी इतवारी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. त्याचे छायाचित्र व्हॉट्स अॅपवर पाठविण्यात आले. त्यावरून पोलिसांनी शोध घेत त्याला अटक केली. त्याच्याकडू 4 हजार 900 रुपये जप्त केले. उर्वेरीत रक्कम खर्च झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
@ फाईल फोटो