संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 27 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विकतूबाबा नगर परिसरात एक 17 वर्षोय अल्पवयिन मुलगी शौचविधिस गेले असता अज्ञात नराधमांनी तिच्याशी लैंगिक अत्याचार केला दरम्यान मुलीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता पुरावा नष्ट करण्याचा हेतूने तिचा गळा दाबून जीवानिशी ठार केल्याची घटना 5 मार्च 2014 ला सायंकाळी साडे सात वाजता निदर्शनास आली असता या घटनेतील मुख्य आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने काल 26 जुलै ला 12 वर्षे शिक्षेची कैद सुनावली तसेच 5 हजार रुपये दंड ठोठावला आहे .व दंड न भरल्यास 4 महिने ची अतिरिक्त शिक्षा सुनावली असून 12 वर्षे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव राकेश भिवालाल शेंदरे वय 27 वर्षे रा रेल्वे मालधक्का रोड, रामगढ कामठी असे आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर मृतक नेहा चव्हाण ही विकतूबाबा नगर येथील आपल्या राहत्या घरी दिसून न आल्याने वडील वीरेंद्र चव्हाण यांनी शेजारी राहणाऱ्या लोकांच्या मदतीने शोध घेतला असता सदर मृतक ही घरामगिल झाडी झुडपीत मृतावस्थेत आढळली होती ,तिच्या अंगावरचे कापड फाटलेले असून तिच्याशी लैंगिक अत्याचार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा गळा दाबून जीवानिशी ठार केले होते.या हत्याकांडाने परिसरात सर्वत्र धक्का बसला होता. शहरात घटनेची निंदनीय चिंता व्यक्त करीत माजी राज्यमंत्री एड सुलेखा ताई कुंभारे यांनी दोन दिवसीय आंदोलन पुकारून आरोपीच्या अटकेची मागणी रेटून धरली होती तर या आंदोलनाला संपूर्ण शहराने समर्थन दर्शविले होते.यावेळी पोलिसांनी 9 संशयित आरोपीना ताब्यात घेतले होते तसेच कमल ब्राह्मणेट व सागर नामक तरुणाला अटक करून त्याविरुद्ध भादवी कलम 302, 201 चा गुन्हा दाखल करीत नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती मात्र ह्या मुलीशी झालेला लैंगिक अत्याचार चा मुख्य आरोपी कोण या शोधकामी पोलिसांनी तब्बल चार वर्षे पाठपुरावा करीत 106 संशीयितांचे डीएनए टेस्ट करण्यात आले शेवटी एका चे संपूर्ण तपासनीत तांत्रिकीय पुराव्यानिशी राकेश शेंदरे वय 27 वर्षे रा रामगढ कामठी ला अटक करीत त्याविरुद्ध भादवी कलम 302, 201, 376, 377, सहकलंम 4, 8 पोकसो ऍक्ट अनव्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून या आरोपीला काल 26 जुलै ला नागपूर च्या जिल्हा व सत्र न्यायालय अतिरिक्त विशेष कोर्ट क्र 16 समोर उभे करून अभियोक्ता अर्चना नायर व आरोपीचे वकील विलास भाडे यांनी न्यायालयासमोर केलेल्या युक्तिवादात न्यायालयाने दोन्ही पक्षाची सुनावणी ऐकत आरोपी ला राकेश शेंदरे ला 12 वर्षे कैद ची शिक्षा सुनावली तसेच पाच हजार रुपये दंड ठोठावला तसेच दंड न भरल्यास 4 महिने अतिरिक्त शिक्षेची कैद सुनावली.
या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अभियोक्ता ऍड अर्चना नायर तर आरोपीच्या वतीने वकील ऍड विलास भाडे यांनी बाजू मांडली., प्रकरणाचा तपास एपिआय देवाजी नरोटे तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस प्रकाश मुसळे व बिसन पोटभरे यांनी कर्तव्यदक्ष भूमिका साकारली.