राज्यात रब्बी ज्वारी खरेदीकरिता ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई :- राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महसंघा मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारी खरेदीसाठी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे पणन महासंघाने कळविले आहे.

शासनाच्या आधारभूत किमंत खरेदी योजनेंतर्गत रब्बी पणन हंगाम २०२३-२४ मध्ये बिगर आदिवासी क्षेत्रात धान व भरडधान्य (मका, ज्वारी व रागी) खरेदीसाठी पणन महासंघाची मुख्य खरेदी संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रब्बी ज्वारी खरेदीसाठी पणन महासंघास ८ लाख २० हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने तसेच नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील रब्बी ज्वारी शिल्लक राहिल्याने शासनाने शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांकडील ज्वारी खरेदीसाठी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

तसेच अमरावती जिल्ह्यासाठी ज्वारी खरेदीचे ८५ हजार क्विंटलचे वाढीव उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, पण त्यांची ज्वारी अजून खरेदी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत त्यांची ज्वारी पणन महासंघाच्या केंद्रावर विक्रीसाठी आणावी. राज्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दिलेल्या सहाय्याबद्दल बृहन्महाराष्ट्र मंडळांनी मानले राज्य शासनाचे आभार

Wed Aug 7 , 2024
मुंबई :- मराठी भाषेचे संवर्धन आणि प्रसार, प्रचार व्हावा यासाठी मराठी भाषा विभागामार्फत विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्राबाहेर मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता काम करणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळांना विविध उपक्रम राबविण्यासाठी आर्थिक साहाय्य केले जात आहे. राज्य शासनाच्या या धोरणामुळे बृहन्महाराष्ट्र मंडळांना मोठे पाठबळ मिळाले असून यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन त्यांचे आणि राज्य शासनाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com