आदिवासी धर्मांतरणाचा मुद्दा पुन्हा विधीमंडळात गाजला, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधिमंडळात मांडला अहवाल

– आयटीमध्ये अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जाती अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणाऱ्या २५७ विद्यार्थ्यांची आढळली नोंद!

मुंबई :- महाराष्ट्रातील आयटीआय संस्थांमध्ये अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जाती अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणारी आणि आदिवासी समाजातून धर्मांतरण करून अल्पसंख्यांक आणि आदिवासी अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणारे विद्यार्थी असल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सखोल चौकशी करण्याचे निर्देश नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दिले होते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये २०२३ सालातील प्रवेश प्रक्रियेमध्ये आदिवासी प्रशिक्षणार्थींनी घेतलेल्या सवलतींच्या लाभामध्ये झालेल्या अनियमततेचा अभ्यास करण्यासाठीया समितीचे गठन करण्यात आले होते. आज या समितीचा अहवाल कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये मांडला.

हा अहवाल बनवताना गठीत केलेल्या समितीने अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या १३८५८ विद्यार्थ्यांची माहिती तपासली आणि यावेळी काही महत्वपूर्ण बाबी समोर आल्या. या १३८५८ विद्यार्थ्यांपैकी २५७ विद्यार्थ्यांनी हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्म नोंदवलेले आहेत. ही बाब गंभीर असून, त्यासाठी पुढीलप्रमाणे उपायोजना करण्यात येणार आहेत.

१. वरील सर्व २५७ विद्यार्थ्यांचा तपशील घेण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी गठीत केलेली समिती संबंधित औद्योगिक प्रशासकीय संस्था, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, ग्रामसभा इत्यादी ठिकाणी भेट देईल आणि अहवाल सादर करेल.

२. धर्म बदललेला असेल तर त्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती ग्राह्य धरल्या जातील का? याबाबत समितीने सर्वंकष अभ्यास करून उपाययोजना सुचवाव्यात असा निर्णय घेण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 4 मार्चला लाईनमन दिवस

Sat Mar 2 , 2024
नागपूर :- देशभरातील लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोमवार दि. 4 मार्च रोजी महावितरणमध्ये लाईनमन दिवस साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस तसेच इतरही अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी मेचोवीस तास सेवादेतात. त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com