अवयवदानासाठी नागरिकांचा पुढाकार आवश्यक – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांचे आवाहन

नागपूर :- अवयवदानाविषयी जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने 3 ऑगस्ट रोजी जागतिक अवयव दिन साजरा केला जातो. नॅशनल हेल्थ पोर्टलनुसार भारतात दरवर्षी 5 लाख रुग्ण अवयवांची उपलब्धता न झाल्याने मृत्यु पावतात. त्यापैकी 2 लाख लोकांचा मृत्यू लीव्हर न मिळाल्याने होतो. एक व्यक्ती आपले अवयवदान करुन एकाच वेळी 8 लोकांना जीवनदान देऊ शकते. अवयवदान हे एक श्रेष्ठदान आहे. यासाठी नागरिकांनी अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी केले आहे.

मानवी शरीराचा प्रत्येक अवयव महत्वाचा आहे. आपल्या शरीराचा एक जरी अवयव निकामी झाला तर जगणे कठीण होते. आज मेडीकल सायन्सने एवढी प्रगती केली आहे की, त्या अवयवाच्या जागी नवीन अवयव प्रत्यारोपण करून रुग्णांचे प्राण वाचवता येतात. परंतु दुर्देवाने आपल्याकडे अद्याप अवयवदान करणाऱ्यांची पुरेशी संख्या नाही, असे त्यांनी सांगितले.

अनेकांना अवयवदान करावयाचे असते पण त्यांना याची प्रक्रीया काय ते माहीत नसते. याबाबत जनजागृती आवश्यक आहे. अवयवदानामध्ये नेत्रदान मृत्युनंतर केवळ 6 तासाच्या आत करता येते. बालकापासून वृध्दांपर्यंत कोणीही व्यक्ती नेत्रदान करु शकते. ज्यांना चष्मा आहे, ते सुद्धा नेत्रदान करु शकतात, ज्यांना ब्लडप्रेशर, डायबिटीस, दमा, आदी विकार असतील ते सुद्धा नेत्रदान करु शकतात.

चेतना व श्वासोच्छवास या दोन्हीचे केंद्र आपल्या मेंदूतील मास्तिक स्तंभ या भागात असते. अपघातात डोक्यात मार लागल्याने, मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने अथवा मेंदुच्या शस्त्रक्रियेनंतर मास्तिक स्तंभास कायम स्वरुपी इजा झाल्यास त्या व्यक्तिचा मास्तिक स्तंभ मृत होऊ शकतो. मस्तिक स्तंभ मृत्यु हा रुग्णालयीन स्तरावरील कमीटीमार्फत एखादया रुग्णाचा ब्रेन डेड अथवा मास्तिक स्तंभ मृत घोषीत करतात. या टिमचा अवयव प्रतिरोपणाशी काही संबंध नसतो. मस्तिक स्तंभ मृत्यु फक्त अवयव प्रतिरोपणासाठी आणि निव्वळ अवयव काढण्यासाठी सरकारी मान्यता असलेल्या रुग्णालयामध्येच घोषीत करता येतो. नातेवाईकास मस्तिक स्तंभ मृत्युचा दाखला देण्यात येतो. ह्दय, किडनी लंग्ज, पानक्रियाज, लिव्हर, इनस्टेनटाईन, स्कीन, बोन, नर्व्ह आणि हार्ट व्हाल्व्ह आदी (Heart, kidneys, lungs, pancreas, liver, intestines, skin, tendons, bone, nerve and heart valves) अवयवदानामध्ये दान करता येते, असे त्यांनी सांगितले.

मृत्युनंतर 6 तासांच्या आत मृत व्यक्तीचे शरीर शरीररचना शास्त्र विभागाकडे (Anatomy Dept) दान करण्यात येते. नवीन ( वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गास मानवी शरीराचा वैद्यकिय अभ्यासाकरता (मेडीकल प्रॅक्टीस) या शरीराचा उपयोग केला जातो. या बाबीला अंगदान असे म्हणतात.

अशाप्रकारे दिल्या गेलेल्या या अवयवदानाच्या प्रक्रीयेत आपल्याला प्रतिज्ञेसाठी नोंदणी करावयाची असल्यास सोप्या पायऱ्याचा अवलंब करून अवयवदान फॉर्म भरता येतो. अवयवदानाच्या प्रतिज्ञेसाठी नोंदणी करण्याच्या पाच सोप्या पायऱ्या आहेत. अवयवदानासाठी नोंदणी करण्याकरीता https://notto.abdm.gov.in$pledge registry/ संकेतस्थळावर जावे आणि Registered for pledge या बटनावर क्लीक करावे. आधार किंवा आभा लिंक केलेल्या मोबाईल नंबरचा उपयोग करुन स्वतःचे प्रमाणीकरण करा. अवयव अथवा उती दान करण्यासाठी फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा आणि दान करण्याकरीता अवयव असे नोंदवा. त्यानंतर आपले प्रतिज्ञा प्रमाणपत्र डाउनलोड करा, असे डॉ राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गीता मंदिरात भोलेनाथ सत्संग सोहळा आज

Sun Jul 28 , 2024
नागपूर :- ओम मंडली शिवशक्ती अवतार सेवा संस्था रायपूर (छत्तीसगड) यांच्यावतीने नागपुरात लोक कल्याणासाठी रविवार, २८ जुलै रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत श्री गीता मंदिर, भागवत भवन कॉटन मार्केट येथे भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ओम ध्वनीचा अचूक आणि शुद्ध उच्चार केल्यास मानसिक तणावातून आराम मिळतो. यशाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात आणि राष्ट्रीय स्तरावर वंदे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com