होर्डिंग युद्धाने कामठी शहर पेटले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नववर्षाला सुरुवात झाल्यापासून शहरात राजकारण्यासह अनेक सामाजिक संस्थानी बॅनरबाजी सुरू केली.विशेष म्हणजे होर्डिंग लावताना पालीकेची रितसर परवानगी घ्यावी लागते यातील किती होर्डिंग परवानगीने लागली आहेत यावर न बोललेलेच बरे.

नववर्षाच्या सुरूवातीपासूनच बॅनरबाजीला उत आला आहे.या बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रुपिकरण होत असून प्रवास्यासह नागरिकांनाही याचा त्रास होत आहे.मात्र या समस्येकडे कामठी नगर परिषदचे लक्ष का जात नाही ,असा सवाल आता शहरवासीयांमध्ये उपस्थित होत आहे.एकीकडे नगर परिषद कडून स्वच्छतेचा नारा दिला जात आहे मात्र बॅनर बाजीने पून्हा एकदा शहरातील महत्वाचे चौक ,रस्त्यावर बॅनर बाजीतून शक्तीप्रदर्शन होत आहे.

विशेष म्हणजे नगर परिषद चे अधिकारी,कर्मचारी दररोज शहरातून ये जा करतात मात्र त्यांना या बॅनर बाजीचा विसर पडला की काय?असा सवालही उपस्थित केला जात आहे.शहरातील मुख्य चौक ,रस्त्यासह प्रशासकीय इमारती समोर मोठमोठे बॅनर होर्डिंग लावून शक्तिप्रदर्शन करीत आहेत यामुळे कामठी शहर बॅनर बाजीने रंगले आहे.

File photo

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रत्येक गाव स्वच्छ करण्याचा संकल्प करा - विभागीय आयुक्त बिदरी

Mon Feb 5 , 2024
· काटोल पंचायत समितीला 28 लक्ष रुपयाचा पुरस्कार · भंडारा पंचायत समितीला 26 लक्ष रुपयाचा पुरस्कार · संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्काराचे वितरण नागपूर :- संत गाडगे बाबा यांनी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले होते. स्वच्छतेमुळे आरोग्यमान उंचावते हा मुळ मंत्र घेऊन संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून विभागातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करण्यासोबत स्वच्छ करण्याचा संकल्प करावा, असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com