अवैधरित्या दारूची वाहतुक करणा-या आरोपीस अटक

– स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Nagpur :-दिनांक ०८.०६.२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान पोलीस स्टेशन पारशिवनी हद्दीत फिरत असता गोपनिय मुखबीरद्वारे मिळालेल्या माहीतीवरून नाकाबंदी केली असता, एक संशईत मारुती ८०० के एम एच ३१ एएच ०८४३ क्रमांकाची कार चेक केली असता, सदर कार मध्ये मोहाफुल गावठी दारूची वाहतुक करतांना मिळून आली.

जप्त मुद्देमाल १) तीन रवरी टयुबमध्ये १५० लिटर मोहाकुल दारू कि १५०००/- २) एक मारुती ८०० क्रमांक एम एच ३१ ए एच ०८४३ चौ कि १,००,०००/- असा एकूण १,१५,०००/- रु चा माल जात केला.

आरोपी नाव :- हरीचंद्र फगलाल मरकाम वय २२ वर्ष रा. शिलादेवी तह पारशिवनी याचेविरुध्द कलम ६५ (अ) (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक माहुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार गजेंद्र चौधरी, रोशन काळे, पोलीस नाईक विपीन गायधने यांचे पथकाने केली आहे.

NewsToday24x7

Next Post

स्त्री अत्याचार करणा-या आरोपीविरूध्द गुन्हा नोंद

Fri Jun 9 , 2023
पोलीस स्टेशन कोंढाळी :- अंतर्गत राजलक्ष्मी सभागृहाचे मागे आर्शिवाद नगर नागपुर ५० कि मी पूर्व यातील फिर्यादी चे लग्न सन २०२० मध्ये आरोपी नामे- फिरोज पठाण सोबत जाती रितीरिवाजाप्रमाणे झाले असुन, लग्न झाले तेव्हा पासुन फिर्यादी चे माहेरी जावुन वारंवार पैशाची, सोन्याची व सामानाची मागनी केली असता, फिर्यादीने त्याची मागणी पूर्ण केली नसल्याने यातील आरोपी नामे- १) फिरोज पठाण २) […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com