दोषी असणाऱ्या स्थानिक पोलीस व अन्य अधिकाऱ्यांना त्वरित बडतर्फ करावे

नागपूर :- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचाराचा सकल मराठा समाज व मराठा विद्या प्रसारक समाज, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने सक्करदरा चौकात मराठा समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यांसाठी अंतरवाली सराटी ता.अंबर, जि. जालना येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजबांधव व आंदोलकांवर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून केलेल्या अमानुष लाठीहल्याचा मराठा विद्या प्रसारक समाजाचे वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.

लाठीहल्ला हा क्रूरपणा असून पोलिसांचे हे कृत्य निंदनीय आहे. या गंभीर घटनेची राज्य शासने उच्चस्तरीय चौकशी करून दोषी असणाऱ्या स्थानिक पोलीस व अन्य अधिकाऱ्यांना त्वरित बडतर्फ करावे.अन्यथा कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाल्यास याला राज्य सरकार जबाबदार राहील. झालेल्या या संपूर्ण घटनेचा सकल मराठा समाज व मराठा विद्या प्रसारक समाज,नागपूर यांचे सह शहरातील समाजबांधवांचे वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. श्रीमंत डॉ. राजे मुधोजी भोंसले यांचे नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाला नागपूर शहरातील समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वादळ संवाद - एक वादळ भारताचं चळवळीचं वार्षिक संमेलन, सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधींचा गौरव सोहळा

Wed Sep 6 , 2023
नागपूर :- एक वादळ भारताचं चळवळीतर्फे 2016 पासून प्रत्येकवर्षी “वादळ संवाद – संमेलन” घेण्यात येत असते. त्याचनिमित्ताने याहीवर्षी “वादळ संवाद” हे संमेलन बळीराजा संशोधन केंद्र, मराठा सेवा संघ लॉन, नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचा उद्देश म्हणजे एक वादळ भारताचं चळवळीच्या माध्यमातून “स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनि” 7 राज्यात, 450 पेक्षा जास्त ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायन व झेंडावंदनाचे कार्यक्रम करण्याची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com