नागपूर :- 2023 हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने केंद्र व राज्य सरकारने 15 ऑगस्ट पासून “मेरा देश, मेरा संविधान” ही संकल्पना राबवावी अशी मागणी नागपूर जिल्हा बसपाने आज मनपा प्रशासक (आयुक्त) व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रपती, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
मागील वर्षी शासनाद्वारे हर घर तिरंगा ही मोहीम राबवली होती. त्यावेळी बसपाने “हर घर तिरंगा हर घर संविधान” ही मोहीम राबविली होती. यावेळी शासनाने “मेरी माटी, मेरा देश” या अभियाना सोबतच “मेरा देश, मेरा संविधान” हे अभियान राबवावे. असे बसपाचे मत आहे.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षात भारतातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत राष्ट्रध्वज पोहोचला. परंतु ज्यामुळे त्याला हक्क व अधिकार मिळाले त्या भारतीय संविधाना पासून आजही तो कोसो दूर आहे. त्या सर्वसामान्याला भारतीय संविधानाची ओळख व्हावी या उद्देशाने प्रत्येक शाळेत व शासकीय, निमशासकीय कार्यालयात संविधानाची प्रत पाठवून “मेरा देश, मेरा संविधान” ही संकल्पना अमलात आणावी. असेही बसपाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
बसपाने हे निवेदन व भारतीय संविधानाची प्रत मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांना बसपाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले. शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, इंजि राजीव भांगे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार बोरकर, विलास सोमकुवर, माजी सभापती व मनपा पक्षनेता गौतम पाटील, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, शहर प्रभारी सुमंत गणवीर, विकास नारायने, माजी शहर प्रभारी योगेश लांजेवार, युवा नेता चंद्रशेखर कांबळे, सदानंद जामगडे, महिला नेत्या सुनंदा नितनवरे, वर्षा वाघमारे, शालिनी शेवारे, नितीन वंजारी, जगदीश गजभिये, जितेंद्र मेश्राम, सुबोध साखरे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.