चंद्रपूर मनपा मुख्यालयात आयुक्त विपीन पालीवाल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न

चंद्रपूर :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 30 ऑगस्ट रोजी होत असून यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवात साजरा होणारा असल्याचे महत्व लक्षात घेत चंद्रपूर महानगरपालिका मुख्यालय येथे १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ वा वर्धापनदिनी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी उपायुक्त अशोक गराटे, उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता महेश बारई,मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी वृंदाप्रमाणेच नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.   भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करीत असताना जनतेच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती चिरंतन तेवत रहाव्यात तसेच देशभक्तीची जाज्वल्य भावना मनात कायम रहावी या भावनेने आपल्या इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्याच्या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ म्हणजेच घरोघरी तिरंगा उपक्रम राबविण्यात आला यात ६० हजार घरी निःशुल्क ध्वज वितरण करण्यात आले. तसेच मेरी माटी मेरा देश म्हणजेच माझी माती माझा देश अभियानातंर्गत विविध उपक्रम सुद्धा राबविण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आरोग्य सेवेची दर्जेदार व्यवस्था उभारण्यास नेहमीच कटीबद्ध - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Wed Aug 16 , 2023
– स्वातंत्र्यदिनी मनपा आरोग्यवर्धिनी केंद्राचे लोकार्पण चंद्रपूर :- भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पुर्ण केली असतांना शासनाद्वारे विविध आरोग्यदायी योजना यशस्वीपणे राबविल्या जात असुन आरोग्य या मुलभुत सेवेसाठी दर्जेदार व्यवस्था उभारण्यास नेहमीच कटीबद्ध राहणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगीतले. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी दादमहल येथील डॉ. जाकीर हुसेन उर्दु प्राथमिक शाळा येथील मनपा आरोग्यवर्धिनी केंद्राचे उदघाटन पालकमंत्री यांच्या हस्ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com