नागपूर :- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात आज, शुक्रवारी (१९ एप्रिल) रोजी मतदान होत आहे.
नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे, रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे, गडचिरोलीत भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान, चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर तर भंडारा-गोंदियात भाजपचे सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यात लढत आहे.
नक्षलग्रस्त भागात ३ वाजेपर्यंतच मतदान
मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी आहे. मात्र,गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी ही चार विधानसभा क्षेत्रे नक्षलग्रस्त आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने तेथे सकाळी ७ वाजता मतदान सुरू होऊन दुपारी ३ वाजता संपेल. ब्रह्मपुरी, चिमूर या दोन विधानसभा क्षेत्रांत मात्र सायंकाळी ६ पर्यंत मतदान होईल.