शस्त्र बाळगणा-या 02 आरोपींना स्थानीक गुन्हे शाखेचे पथकाने केले अटक

नागपुर –  स्थानीक गुन्हे शाखेचे पथक हे घरफोडी गुन्हयाचे तपास करीत असतांना, गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली कि, मौजा तमस्वडी येथील श्रीकांत प्रल्हाद नारनवरे वय 30 वर्ष याचे घरी देशी अग्निशस्त्र आहे. अश्या  माहिती वरुन  पंचासह नमुद ठिकाणी झडती घेतली असता, त्याचे घरी एक देशी अग्निशस्त्र व पाच जिवंत कारतुस असा एकुण 50000/-रू चा माल मिळुनआला. त्यास सखोल विचारपुस केली असता त्याने सांगितले कि, सदर चे शस्त्र हे सागर साहरे रा दहेगाव जोशी याने दिल्याचे सांगितले. तसेच प्रतिक लिलाधर चवरे रा सिल्लेवाडा  यातुन दोन काडतुस फायर
केल्याचे सांगितले. यावरून पोलीस स्टेशन पारशिवनी येथे पुढील कार्यवाही करीता दोन आरोपी नामे प्रतिक चवरे व श्रीकांत नारनवरे यांना पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन पारशिवनी यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई  पोलीस अधिक्षक  विजयकुमार मगर, अपर पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, यांचे आदेशाने स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक अनिल राउत, पोलीस हवालदार विनोद काळे, ज्ञानेश्वर  राउत, पो नाईक विरेंद्र नरड,चालक सफौ साहेबराव बहाळे यांचे पथकाने केली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com