संपूर्ण परिसरात पसरला होता दुर्गंधी धूर,वाडी नप.ने केले युद्ध स्तरावर प्रयत्न
वाडी :- वाडी परिसरातील जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाजवळ असलेल्या खाली जागेवर जमा झालेल्या टाकाऊ वैद्यकीय कचऱ्याला काल रात्री अचानक लागल्याने जवळच असणाऱ्या वसाहती मध्ये दाट दुर्गंधीयुक्त धूर पसरला होता,याची माहिती वाडी नप. ला मिळताच त्वरित मुख्याधिकारी डॉ.विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच युद्ध स्तरावर यंत्रणा कामी लावून आज दुपारपर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.
प्राप्त माहितीनुसार वाडी परिसरात असलेल्या या जागेवर एमआयडीसी कंपनी,वसाहती व दवाखान्यातील काल बाह्य औषधी चे वेस्टर्न, प्लास्टिक कचरा जमा झाला होता, या कचऱ्याला काल रात्रीं कुणीतरी अज्ञात इसमाने आग लावून पसार झाला, त्यानंतर काही वेळातच परिसरात दुर्गन्धयुक्त धुरच धूर पसरल्याने नागरिक अस्वस्थ झाले होते.याची सुज्ञ नागरिकांकडून वाडी नगर परिषद कार्यालयाला माहिती मिळताच मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी अग्निशमन विभागास त्वरित सूचना देऊन घटनास्थळी पाठविले,सोबतच जेसीबी,मनपा अग्निशमन अश्या आवश्यक यंत्रणेला कामी लावून मुख्याधिकारी डॉ.विजय देशमुख स्वतः उपस्थित राहून यांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी अग्निशमन विभागाचे रोहित शेलारे,स्वच्छता व पाणी पुरवठा अभियंता सुषमा भालेकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय गोतमारे,योगेश जहागीरदार,माजी नगरसेवक आशिष नंदागवळी प्रामुख्याने उपस्थित होते.
सध्यावस्थेत ही जागा खाली व मोकळी झाल्याने आता या ठिकाणी पुन्हा टाकाऊ वैद्यकीय कचरा जमा होऊ नये यासाठी चार पहारेकरी ठेवून सौंदर्यीकरणासह हायमास्ट दिवे व वृक्षलागवड करून हा परिसर सुशोभित करण्याचे मनोगत यावेळी मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी व्यक्त केले.