अंतिम मतदार यादी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार

मुंबई :- भारत निवडणूक आयोगाने दि. १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा दिनांक २२ जानेवारी, २०२४ (सोमवार) असा होता. तथापि, राज्य शासनाने १९ जानेवारी, २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार सोमवार २२ जानेवारी, २०२४ रोजी श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या १९ जानेवारी, २०२४ रोजीच्या पत्रान्वये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या २३ जानेवारी, २०२४ (मंगळवार) रोजी करण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत कळविण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबई फेस्टिव्हल 2024 मध्ये ‘महा मुंबई एक्स्पो’चे उद्घाटन

Sat Jan 20 , 2024
– महाराष्ट्राच्या भूमीत पर्यटनाच्या अमर्याद संधी – पर्यटन मंत्री गिरीश महाजन मुंबई :- ‘महा मुंबई एक्स्पो’ मध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रतिभेचे आणि मुंबई शहराचे बहुआयामी सौंदर्य मांडण्यात आले आहे. मुंबई फेस्टिव्हल अंतर्गत सुरु असलेल्या ‘महा मुंबई एक्स्पो’ ला सर्वांनी जरुर भेट द्यावी, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि वैविध्य दर्शविणाऱ्या मुंबई फेस्टिव्हल 2024 मधील ‘महा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com