सिद्धार्थ बुद्ध विहार व श्री कृष्ण मंदिर परिसराच्या प्रलंबित विभागणी जागेचा वाद निकाली

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 13 येथील सिद्धार्थ बुद्ध विहार व श्री कृष्ण मंदिर जागेच्या सीमांकन विभागणीभिंत चा वाद हा मागील काही वर्षांपासून प्रलंबित होता यावर दोन्ही समाजबांधवांना आमदार चंद्रशेखर बावनकुळे व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी मध्यस्थी करून योग्य तो मार्ग काढून सदर प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी मोलाची भूमिका साकारली होती यावर उपरोक्त नमूद दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनार्थ मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या मुख्य उपस्थितीत आज नगर परिषद सभागृहात दोन्ही समजबांधवांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सिद्धार्थ बुद्ध विहार व श्री कृष्ण मन्दिर या जागेच्या मधोमध असलेल्या पिंपळाच्या झाडापासून एक फिट जागा पूर्व ते पश्चिम दिशेने तयार करण्यात यावी व त्यानुसार नगर परिषद ने दोन्ही जागेच्या मधोमध विभागणी भिंत तयार करावी व त्यानुसार नगर परिषद ने विभागणी भिंतीचे कार्य करावे असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

प्रभाग क्र 13 अंतर्गत बौद्ध,मुस्लिम ,हिंदू बहुल नागरिक वास्तव्यास असून इथे प्रत्येक सण हा कौमी एकतेच्या वातावरणातून साजरा केला जातो.मागील काही वर्षांपासून एकीकडे असलेल्या सिद्धार्थ बुद्ध विहार तर दुसरीकडे असलेल्या भगवान श्री कृष्ण मन्दिर च्या सीमांकन जागेचा वाद निर्माण झाला होता. या वादाची ठिणगी न पडावी यासाठी दोन्ही समाजबांधवानी सामंजस्याची भूमिका घेत माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सदर विषय ठेवण्यात आला.यासंदर्भात सदर दोन्ही नेत्यांनी विषय गांभीर्याने घेत समजूत काढण्यात आली.अखेर हा प्रलंबित असलेला वाद ऍड सुलेखा कुंभारे व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शणार्थ मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या उपस्थितीत

आज नगर परिषद सभागृहात निकाली लागल्याने लवकरच विभागणी भिंत तयार होऊन दोन्ही वास्तूच्या विकासकामाला गती मिळेल.

हा वाद सामंजस्याने निकाली काढण्यात आमदार चंद्रशेखर बावनकुळे व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी लोकप्रतिनिधीची मोलाची भूमिका साकारली या दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनार्थ मुख्ययाधिकारी संदिप बोरकर यांनी मुसद्दी भूमिका घेतली. या सभेत कार्यकारी अभियंता वीरेंद्र ढोके, संजय जैस्वाल,अनिल यादव, कमलकिशोर यादव, नंदलाल यादव,निशांत यादव,देवाशीष यादव, अविनाश उकेश, विकास रंगारी,लाला खंडेलवाल, कपिल गायधने,काशिनाथ प्रधान,मिरा शंभरकर, नरेंद्र मेश्राम,शोभा घोडेस्वार,अविनाश रामटेके,अरुण शेलारे, सुमित गायकवाड,यादव युवा चेतना समिती ,श्रीकृष्ण मन्दिर समिती , तसेच सिद्धार्थ बुद्ध विहार समितीचे पदाधिकारी व सदस्य गण मोठ्या संख्येत उपस्थित होते.सदर विषय मार्गी लागल्याने यादव व बौद्ध या दोन्ही समाजबांधवा च्या वतीने आमदार चंद्रशेखर बावनकुळे ,माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे,मुख्यअधिकारी संदीप बोरकर यांचे मनपूर्वक आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील चार अंगणवाडी केंद्रात 8 लक्ष रुपयांचा साहित्य घोटाळाप्रकरणात सिडीपीओ विरुद्ध गुन्हा दाखल

Wed Jun 26 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- अंगणवाडी श्रेणीवर्धन योजने अंतर्गत साहित्य पुरवठा करण्यासाठी कामठी तालुक्यातील अंगणवाड्याना प्राप्त निधीतून कामठी तालुक्यातील चार अंगणवाडी केंद्रात 8 लक्ष रूपयाचा साहित्य घोटाळा झाला असून यासंदर्भात कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले यांनी कामठी पंचायत समितीचे सिडीपीओ विरुद्ध नविन कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदविली त्यानुसार नवीन कामठी पोलिसांनी केलेल्या चौकशीत कामठी पंचायत समितीच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com