संविधानामुळेच देश एकसंघ- गणेश सोनटक्के, प्रेरणा कॉन्व्हेंट येथे संविधान दिन साजरा

संदीप बलवीर ,प्रतिनिधी

नागपूर :- भारतीय संविधान हे जगातील सर्वांग सुंदर संविधान असून,भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका हि जगातील सर्वोच्च उद्देशपत्रिका आहे.कारण भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेची सुरुवात कुठल्याही देवाच्या किंवा अल्लाहच्या नावाने झाली नसून “आम्ही भारताचे लोक एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष,गणराज्य” अशी केली आहे. त्यामुळेच देशात विविध जाती व धर्माचे लोकं राहतात,विविध संस्कृती, भाषा, पेहराव व अनेक राज्यांना जोडून देशातील लोक हे संविधानामुळेच एकसंघ बांधले असल्याचे प्रतिपादन प्रेरणा कॉन्व्हेंय येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना संस्थेचे संचालक गणेश सोनटक्के यांनी व्यक्त केले.

आज दि २६ डिसें ला संविधान दिनाच्या ७३ व्या वर्धपन दिनाचे औचित्य साधत प्रेरणा कॉन्व्हेंट येथे संविधान दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक गणेश सोनटक्के तर प्रमुख अथीती म्हणून पत्रकार संदीप बलविर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सर्व शिक्षक,विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन केले.त्यांनतर शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सुद्धा भारतीय संविधान व संविधान दिनाचे महत्व आपापल्या मनोगतातून व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवयुवक उच्च प्राथमिक शाळा कामठी येथील विद्यार्थांनी काढली संविधान रॅली

Sat Nov 26 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आज २६ नोव्हेंबर सकाळी ९:०० वाजता नवयुवक उच्च प्राथमिक शाळा, गौतम नगर , कामठी येथील विद्यार्थ्यांनी कुंभारे कॉलनी परिसरात संविधान रॅली काढून संविधान दिनाच्या निमित्ताने बोधी वाचनालय परिसर येथे पथनाट्य सादर करण्यांत आले व परिसरात संविधान दिनानिमीत्य जनजागृती करण्यांत आली. तसेच नवयुवक उच्च प्राथमिक शाळेच्या पटांगणात सकाळी ११.००वाजता संविधान प्रस्ताविका चे सामूहिक वाचन करून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com