संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
-समूह राष्ट्रगीताने गाजला कामठी तालुका
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
कामठी ता प्र 17 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त शासनाने मार्गदर्शीत केलेल्या सूचनांचे पालन करीत कामठी तालुक्यात ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले त्याअंतर्गत आज बुधवार 17 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात कामठी तहसील कार्यालय, कामठी पंचायत समिती,कामठी नगर परिषद तसेच शहरातील सर्व खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था,शहरातील समस्त नागरिकांसह सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यासह ,सहकारी संस्था, सर्व यंत्रणांनी सहभागी होत हा उपक्रम यशस्वीपणे राबवला .सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात झाली व सकाळी 11 ते 11 वाजून एक मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करण्यात आले.या समूह राष्ट्रगीताचा सर्वत्र गाजर झाल्याने या समूह राष्ट्रगीताने कामठी तालुका दुमदुमला.
यानुसार आज सकाळी 11 वाजता कामठी तहसील कार्यालयात तहसीलदार अक्षय पोयाम सह अन्य अधिकारी कर्मचारी च्या मुख्य उपस्थितीत समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले दरम्यान तहसील कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी जागीच उभे राहून राष्ट्रगीत गायले.
तर कामठी नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी संदीप बोरकर, पंचायत समिती कार्यालयात बीडीओ अंशुजा गराटे ,नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे यासह आदी शासकीय निमशासकीय कार्यालयात संबंधीत उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुख्य उपस्थितीत समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले.