अर्थसंकल्पात गरीब, मध्यमवर्गीय व शेतकरी यांना दिलासा दिलेला नाही – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. नंदा पराते

नागपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात समाजातील विविध घटकांना न्याय देणार असल्याचे काहीही नाही. बीजेपी सरकारने गरीब ,मध्यमवर्गीय,शेतकरी व महिला यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. महागाई कमी करतील याची उत्सुकता महिलांमध्ये होती पण निराशा झाली. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांचे मत आहे.

संसदमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात आदिवासी, ओबीसी ,दलित व अन्य मागासवर्गीयांना सामाजिक न्याय देणारी योजना नाही त्यामुळे सर्व समाजाची निराशा झालेली आहे, असे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष व महराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड.नंदा पराते यांचे मत आहे.

युवकांना रोजगार देण्यासाठी , शेतकऱ्यांच्या शेतीमालास भाव मिळण्यासाठी , महिलांना न्याय देणारी व गरिबांना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी योजना नाहीत यामुळे युवा,महिला,शेतकरी व गरीबांची घोर फसवणूक झालेली आहे. मोदी सरकारने संसदमध्ये अर्थसंकल्प सादर केला, तो नागरिकांसाठी निराशाजनक आहे अशी शहर महिला काँग्रेस अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांनी टीका केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी मिहान, बुटीबोरी व हिंगणा येथे विशेष कॅम्पचे आयोजन - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

Tue Jul 23 , 2024
▪️ योजनेचे उद्योग जगताकडून उत्स्फूर्त स्वागत नागपूर :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना एक अभूतपूर्व संधी उपलब्ध झाली आहे. आपल्या शैक्षणिक पदवी अथवा पदविकासह प्रत्यक्ष कार्यानुभवाची जोड जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आवश्यकते धैर्य निर्माण होत नाही. विद्यावेतनासह अनुभवाची बेरोजगारांना मिळालेली ही अपूर्व संधी आहे. याचबरोबर उद्योग जगतालाही आपल्याला आवश्यक असेल तसे मनुष्यबळ या नव्या अभिनव योजनेतून उपलब्ध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com