संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- समतेच्या प्रवाहातील सजग सैनिक मिल मजदूर अल्प शिक्षित असुन सुद्धा डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र आदोलनात अग्रगण्य काव्य लेखन गायन करून अज्ञान अंधकार चमत्कार अनिष्ट असंभ्य रूढी, अन्याय अत्याचार जोर जुलूम विरूद्ध लढण्यास सज्ज करूण दासबालक या नावाने चिरपरिचीत पण धंम्म क्रान्ती नंतर प्रियबालक या नावाने गाव कुसातील जनसामान्य लोकापर्यत धम्म विचार प्रसारीत करून धम्मक्षेत्रातील एक अभ्यासु चिंतक चिकित्सक प्रबोधक कविवर्य उदयभान ऊके यांच्या शेकडो शाखा आजतागायत कार्यरत असुन २४ व्या पुण्यस्मरण दिन निमित्त अभिवादनिय आदराजली अर्पण करतांना त्याना अपेक्षित धंम्म प्रचार प्रसार कार्य पूर्णत्वास नेत असतांना आपली बेरीज वजाबाकी करणे व प्रबुद्ध भारत निर्माण करण्या करीता व विषमतावाद्याकडून होत असलेल्या क्लूप्त्यांना विनष्ट करण्याचा प्रयत्न हिच आवहानात्मक अपेक्षाकृत भावना भदंन्त नाग दिपांकर महास्थविर सल्लागार बुद्ध धंम्म प्रचारक आदर्श कवी मंडळ नागपुर व मार्गदर्शक प्रियबालक भजन मंडळ परीवार नागपुर यांनी व्यक्त केले.
बोले गर्जुन हा भीम राणा या भारतीयांच्या पुढे, बंधुनो रे भगिणीनो घ्या समानतेचे धडे, किंवा उठा बंधुनो बघा झडकरी आपुल्या मार्गाकडे चालु द्या धम्माचा रथ पुढे पुढे अशा प्रकार चे दोनशेच्या वर अभंग पद ओवी ची निर्मिती करणारा झंझावात आजही चिरंतन उर्जा देण्याचे कार्य करतो कामठी येथील यशोधरानगर वसाहतीतील डाॅ बाबासाहेब आंबेडकर संस्थागार येथे कविवर्य उदयभान उके याच्या पुण्यस्मरण दिन निमित्त बोलत होते उपरोक्त कार्यक्रमास बुद्ध धंम्म प्रचारक आदर्श कवी मंडळ नागपुर चे अध्यक्ष रविद्र बोरकर पुर्व अध्यक्ष सुधाकर पाटील, उपाध्यक्ष विजय ऊके, प्रियबालक भजन मंडळ परीवार चे जेष्ट सल्लागार केवल जी वानखेडे, दिगाबर बनकर, युवराज अडकणे, सुनिल नितनवरे, भीमसेन तांबे सुधिर शंभरकर, अखिल येवले,प्रविण सोनेकर, संजय गायगवळी महादेव भसारकर श्रीकृष्ण सोमकुवर, राजकुमार अडकणे, सचिन गौरे विनोद येवले रमेश गजभीये पिन्टु मोटघरे सुरेखा अडकणे ऊषा ताबे, रमाताई ऊके शोभाबाई सोमकुवर, प्रियबालक भजन मंडळ परीवार चे सदस्य व डाॅ बाबासाहेब आंबेडकर संस्थागार चे विद्याताई भिमटे, छायाताई गाडगे, सविता जनबंधू, सुजाता बावनगडे, सुशिला चव्हान, रमा पाटील, पुष्पा रामटेके, शोभा मेश्राम, किरण वाहणे,नंदा डोंगरे,माया भोवते,क्रिश्ना रामटेके, भैयालाल भोयर, किशोर भिमटे, तुकडोजी बन्सोड आदी उपस्थित होते.