कोदामेंढी :- दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील श्री राधाकृष्ण विठ्ठल रुख्माई मंदिर येथे रविवार 20 ऑक्टोबरला सकाळी पाच वाजता काकड आरती ,सात वाजता आरती करून श्री गजानन ,जय गजानन ,गण गण गणात बोते या जयघोषाने पालखी काढण्यात आली. पालखीमधे टाळकरी, विनाधारी, झेंडाधारी ,पताकेधारी व श्री गजानन भजन व पारायण मंडळ यांच्या भजनाने कोदामेंढी येथून वाजत गाजत पालखी भांडेवाडी , खापरखेडा ,पारडी, निमखेडा मार्गे श्री संत गजानन महाराज मंदिर तारसा येथे डीजे व तारसा वारकरी भजन मंडळाच्या भक्तिमय संगीताने वाजत ,गाजत, नाचत पोहोचली. पालखी श्री च्या मंदिरात पोहोचताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. लगेच गिरडकर महाराज व तांबुलकर महाराजांचे प्रवचन झाले. आरती नंतर लगेच महाप्रसाद देण्यात आला.
तारसा येथील बाल्या भुजाडे व त्यांचे सर्व ट्रस्टी यांनी सर्वांचे स्वागत केले. पालखी करिता श्री गजानन भजन व पारायण मंडळाचे मगन बावनकुळे ,भैय्या बावनकुळे, सतीश फटिंग, श्याम देवतळे , उपसरपंच गोपाल गिरमेकर, भोजराज मोहनकर, राजू मोटधरे,जितू बावनकुळे ,विवेक बावनकुळे , भगवान मसराम ,कवडू बारईसह समस्त भक्तगणांनी परिश्रम घेतले. कोदामेंढी ते तारसा दरम्यान ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. कुठे नाश्ता, कुठे आलू भात, कुठे प्रसाद ,कुठे ताक ,तर कुठे महाप्रसाद देऊन भक्तगणांच्या उत्साह व ऊर्जा द्विगुणीत करण्यात आला.गावोगावातील सामाजिक कार्यकर्त्यां व राजकीय कार्यकर्ते गट ग्रामपंचायत भांडेवाडी च्या सरपंच मंगला देशमुख, सामाजिक कार्यकर्ते विष्णू देशमुख,अरोली येथील भारत गॅस चे मालक उपसरपंच सुनील आडगूळकर ,प्रदीप पाटील, नाना गजभिये ,खापरखेडा येथील सुरेश सज्जा सह गावागावातील भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने मदत केली. गावागावातून पालखी जात असताना नगारा ,ढोल व फुलांच्या वर्षाव करून भक्तगणांचे स्वागत करण्यात आले. त्यादिवशी कोदामेंढी ते तारसा मार्ग गजाननमय झाले होते.