संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कन्हान नदीच्या पुलाखाली नदीच्या कडेला असलेल्या दगडावर एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना आज सकाळी साडे दहा वाजता निदर्शनास आली असून रेल्वे गाडीच्या धडकेने घडलेली अपघाती मृत्यूची घटना असावी असा तर्क लावण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदनार्थ शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले या अनोळखी मृतदेहाची ओळख अजूनही पटलेली नसून पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
या अनोळखी मृतकाचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असून उंची 5 फूट चार इंच,रंग सावळा, बांधा सडपातळ,अंगात निळ्या रंगाचा फुल शर्ट व फिकट निळ्या रंगाची पॅन्ट,केस काळे तसेच हातावर एक नाव गोंदलेले आहे.