संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती थोरपुरूष विचारमंच मित्र परिवार टेकाडीव्दारे कार्यक्रमासह थाटात साजरी करण्यात आली.
मंगळवार (दि.१) ऑगस्ट २०२३ ला टेकाडी येथे थोरपुरुष विचारमंच मित्र परिवार टेकाडी व्दारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम ग्रा प सरपंच टेकाडी विनोद इनवाते यांचे अध्यक्षतेत तर प्रमुख अतिथी ग्रा प टेकाडी सदस्य सतिष घारड, अर्चना वासाडे, तारकेशरी मोरे, कविता चव्हाण आदीच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी लोक शाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जिवन चरित्रावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मनोज लेकुरवाळे, अमित वासाडे, रमेश बालपांडे, नंदकिशोर लेकुरवाळे, हूड काकाजी, कैलास मनघटे तसेच गुरुकृपा आखाडा टेकाडी चे खेळाडू मुले, मुली उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनार्थ प्रविण चव्हाण, निलेश गाडवे, आभिजित चांदुरकर हयानी परिश्रम घेतले.