महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

नागपूर :- थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ करणाऱ्या इसमाविरोधात यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवेशनगर परिसरात गुरुवारी दुपारी ही घटना घडली.

मोहम्मद अशफाक असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहे. वारंवार सुचना करूनही प्रवेशनगर येथील वीज ग्राहक नदीम खान या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ शंकर धानोरकर आणि सहकारी आसाराम देशमुख व अशोक सहारे हे बिज बिल वसुली करण्याकरीता गेलो असता तेथे विज वापर करणारे मोहम्मद अशपाक यांना थकीत विज बिल बाबत माहिती देवुन थकीत बिल भरण्याबाबत सांगीतले असता धानोरकर यांचेशी भांडण केले आणि कॉलर पकडुन शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली. सोबतच सहकारी कर्मचारी यांना देखील शिवीगाळ केली.

यासंदर्भात धानोरकर यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात मोहम्मद अशफाक यांचे विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ अन्वये शासकीय कामात हस्तक्षेप आणि लोकसेवकाला मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,

महावितरण, नागपूर

NewsToday24x7

Next Post

आयुष्यमान कार्ड नोंदणीमध्ये जिल्हा प्रथम राहील यासाठी प्रयत्न करा - जिल्हाधिकारी

Sat Sep 16 , 2023
– जिल्हास्तरीय ‘ आयुष्मान भव:’कार्यक्रमाची पाचगाव येथून सुरूवात  – नागपूर जिल्हयाला निक्षय योजनेतंर्गत राज्यस्तरीय पुरस्कार नागपूर :- केंद्र व राज्य सरकारच्या बहुआयामी आयुष्मान भव: कार्यक्रमाची जिल्हास्तरीय सुरुवात नागपूर जिल्ह्यातील पाचगाव येथून आज करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या केंद्रीय व राज्यस्तरीय कार्यक्रमासोबतच सामान्य नागरिकांच्या आरोग्याकडे लक्षवेधणाऱ्या या योजनेचा शुभारंभ जिल्ह्यात झाला. उमरेड विभागात येणाऱ्या पाचगाव आरोग्य केंद्र जिल्हा प्रशासन व […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com