बांधकाम आणि पाडाव कचऱ्यावर भांडेवाडी येथे होणार पुनर्वापर प्रक्रिया

आयुक्तांनी केली करारनाम्यावर स्वाक्षरी

नागपूर : नागपूर शहरात दररोज निर्माण होणारा बांधकाम आणि पाडाव (Construction and Demolition) कचरा कमी होणार असून शहर आणखी स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होणार आहे. रामकी एन्व्हायरो इंजिनियर लिमिटेड अंतर्गत कार्यरत हैद्राबाद सी अँड डी वेस्ट प्रा. कंपनीतर्फे नागपूर महानगरपालिका हद्दीतील बांधकाम व पाडाव वेस्टवर पुनर्वापर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासंबंधी नागपूर महानगरपालिका आणि रामकी हैद्राबाद सी अँड डी वेस्ट प्रा. कंपनीमध्ये करार करण्यात आला असून शुक्रवारी (ता. २५) मनपाच्या प्रशासकीय इमारतीमधील आयुक्तांच्या कक्षात आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत मनपाच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी आणि कंपनीच्या वरिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक माधवी जी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

          यावेळी उपअभियंता राजेश दुफारे, रामकी एन्व्हायरो इंजिनियर लिमिटेडचे व्यवस्थापक मेहबूब सुभानी शेख, कनिष्ठ अभियंता प्रशांत वाघमारे, सल्लागार मेसर्स आर जगताप अँण्ड असोसिएट तर्फे यादव आदी उपस्थित होते.

          सदर कंपनीला प्रक्रिया युनिट तयार करण्यासाठी मनपातर्फे भांडेवाडी येथे ५ एकर जमीन देण्यात आलेली आहे. कंपनीच्या व्यवस्थापकांनी शुक्रवारी जमिनीची पाहणी सुद्धा केली. कंपनी प्रति दिवस जवळपास २०० टन सी अँड डी कचऱ्यावर पुनर्वापराची प्रक्रिया करणार आहे. यातून बांधकामाला लागणारे साहित्य जसे की, रेती, विटा, पेव्हर ब्लॉक, टाईल्स बनविण्यात येणार आहे. सी अँड डी कचरा शहरातून गोळा करण्यासाठी संपूर्ण पायाभूत सुविधांची व्यवस्था कंपनी करणार आहे. अशा प्रकारचा दुसरा प्रकल्प महाराष्ट्रात आता नागपूर महानगरपालिका हद्दीत सुरु होत आहे.

          या प्रकल्पामुळे शहरात रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागांवर, निवासी भागातील सी अँड डी कचरा पूर्णपणे कमी होईल. यामुळे नागपूर शहर अधिक स्मार्ट आणि स्वच्छ होण्यास मदत होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व खाजगी शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याच्या सूचना - वर्षा गायकवाड

Fri Mar 25 , 2022
मुंबई, दि.२५ –  राज्यातील सर्व माध्यमांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसविणे बाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार येणारे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व खाजगी शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे ते सुरू असतील याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल.असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केले.             शालेय शिक्षण मंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या, राज्यातील शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सी.सी.टी.व्ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights