लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कन्हान ला थाटात साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – शहर विकास मंच द्वारे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची १०२ व्या जयंती संताजी नगर कांद्री-कन्हान येथे थाटात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा कांद्री ग्राम पंचायत सदस्य सिंधुताई वाघमारे यांच्या हस्ते व मंच मार्गदर्शक प्रभाकर रुंघे, ताराचंद निबांळकर, प्रल्हाद वाघमारे यां च्या प्रमुख उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून कार्यक्रमा ची सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने उप स्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे हयांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित मंच पदाधिका-यारी व सदस्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करित १०२ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र साबरे यांनी तर आभार ऋृषभ बावनकर यांनी व्यकत केले. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, उपाध्यक्ष महेंद्र साबरे, सचिव सुरज वरखडे, सहसचिव प्रकाश कुर्वे, हरीओम प्रकाश नारायण, सुरेश आंबीलडुके, धर्मेंद्र गणवीर सह मंच पदाधिकारी व नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

टायर च्या वादाने दोन आरोपींनी हातबुक्याने व लाकडी दंड्याने मारहाण करून केले जख्मी

Mon Aug 1 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी प्लाॅट नं ३ बाळबुधे ले-आऊट टेकाडी येथे शिवम टायर रिमोडिंग च्या दुकानात दोन आरोपींनी दुकानदार व त्याच्या वडी लाला लाकडी दंड्याने व हातबुक्याने मारहाण करून जख्मी केल्याने पोस्टे कन्हान येथे पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे . […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com