एसटी बस मध्ये ज्येष्ठ नागरिकांचे वय अजूनही 65 वर्षे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 2-शासनाकडून 60 वर्षे वयाच्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र दिले जाते मात्र एस टी बस मध्ये तिकीटावरील 50 टक्के सवलत घेण्यासाठी 65 वर्षे वयाची अट असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र असूनही त्यांना लाभ मिळत नसल्याची बाब नुकतीच कामठी बस स्थानकावर निदर्शनास आली असून यामुळे ज्येष्ठ असूनही सवलतीचा लाभ मिळत नसल्याने ज्येष्ठांमध्ये एस टी बस प्रशासना विरोधात नाराजगीचा सूर वाहत आहे.
ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक उन्नती, ताणतनावातून मुक्त,उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले असून त्यांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले आहेत.सर्व प्रकारच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा 65 वरून 60 वर्षे करण्यात आल्याची घोषणा सामाजिक न्याय आणि विशेष सहाययमंत्री राजकुमार बडोले यांनी जुलै 2018 मध्ये केली होती. तरीसुद्धा ज्येष्ठ नागरिकासंदर्भात आजूनही गोंधळाची स्थिती कायम आहे.
.राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बस मध्ये प्रवासी सवलत मिळविण्यासाठी वयाच्या अटीवरून अनेक मतप्रवाह आहेत. काही वाहक 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना सवलत देतात तर काही वाहक 65 वर्षाची अट घालतात.याबरोबरच ज्येष्ठ नागरिक म्हणून असलेल्या ओळ्खपत्राच्या सत्यतेबाबतही वाहकाकडून विचारणा होत असल्याने अनेकदा ओळ्खपत्रावरील वय आणि फोटोतील चेहरा यावरून वयाचा अंदाज लावून प्रवासाची सवलत नाकारत जात असल्याचेही प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येते.ज्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिकाची ओळखपत्र (जी शासनाने निर्गमित केली आहेत)ती दाखविल्या नंतर त्याना 65 वर्षे पूर्ण असल्याशिवाय 50 टक्के सवलतीचे तिकीट दिले जात नाही याबाबत नेमके काय धोरण आहे ?वा ज्येष्ठ नागरिकांचे वय 60 वर्षे केल्याचा आदेश अद्याप एसटी महामंडळाकडे आला नाही काय?असा प्रश्न नागरिकाकडून विचारला जात आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार वाचनालयात आयुक्तांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Fri Jun 3 , 2022
नागपूर : ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (ता.२) ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार वाचनालय जयताळातर्फे अभिवादन करण्यात आले. श्रध्दांजली कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव नरेंद्र जिचकार, माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील तसेच विद्यार्थी व गावकरी  उपस्थित होते. या प्रसंगी ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com