जिवानीशी ठार मारणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- दिनांक २६.०३.२०२४ चे १६.४५ वा. चे सुमारास, फिर्यादी घनश्याम बळीराम आडे वय ५१ वर्ष रा. प्लॉट नं. १२१/ए, श्रीपुर्णा ले-आउट, साई नगर दाभा, नागपूर यांचा मुलगा नामे लिखीत उर्फ लक्की घनश्याम आहे वय २८ वर्ष हा व आरोपी सागर उर्फ आरूष गौतम घोष वय २६ वर्ष रा. तवक्कल ले-आउट, मदिना मस्जिद जवळ, वाडी, नागपूर असे पोलीस ठाणे वाडी हद्दीत विष्णूदास रामदास लोखंडे यांचे घरी टेकडीवाडी, जिल्हा परिषद शाळे जवळ, दारू पित्त होते, दारू पिल्यानंतर आरोपी व फिर्यादीचा मुलगा यांचा वाद झाला. त्यामध्ये आरोपीने फिर्यादीचे मुलास जिवानीशी ठार मारण्याचे उद्देशाने लोखंडी कुन्हाडीने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले, तसेच त्यांना वाचविण्याकरीता गेलेले विक्की लोखंडे यांना सुध्दा हाताला जखम झाली, जखमी फिर्यादीचे मुलास उपचाराकरीता मेडीकल हॉस्पीटल येथे गेले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे वाडी येथे मसपोनि, देवकर यांनी आरोपीविरूध्द कलम ३०२, ३३७ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंदवुन, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रांणाकीत अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Thu Mar 28 , 2024
नागपूर :- दिनांक २२.०३.२०२४ चे ०९.०० वा. चे सुमारास, फिर्यादीचे वडील नामे महादेव खुशाल तिजारे, वय ६८ वर्षे, रा. १०३, पडोळे नगर, वाठोडा रोड, नंदनवन, नागपूर हे पोलीस ठाणे नंदनवन हद्दीतुन वाठोडा रोड, संघर्ष नगर पि.यु.पी गोडावुनचे समोरून पायदळ आपले कामावर जात असतांना, एका अज्ञात अॅक्टीव्हा गाडीचे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन फिर्यादीचे वडीलांना धडक देवून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights