संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 19 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ईदगाह मैदानाजवळील मासुमशाह दरगाह येथे आयोजित उर्स निमित्त कामठी पोलीस बंदोबस्त मध्ये कर्तव्य बजावत असताना एक काळ्या रंगाची संशय्यीत दुचाकी बजाज पलसर ने दोन अज्ञात इसम जात असता पोलीस पाहून दुचाकी चालकाने वाहन जोरात पळविण्याचा प्रयत्न केल्याने मागे बसलेला इसम हा रस्त्याचा कडेला खाली पडला व दुचाकी चालक वाहन घेऊन पळून गेला ,पोलिसांनी खाली पडलेल्या इसमाला ताब्यात घेतला असता सदर इसम वारीसपुरा रहिवासी व तत्कालीन डीसीपी निलोत्पल यांच्या 28 डिसेंबर 2020 च्या आदेशानव्ये नागपूर जिल्ह्यातून बाहेर 2 वर्षासाठी हद्दपार असलेला निष्पन्न झाले तर हा हद्दपार आरोपी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत विनापरवानगी वावरताना मिळून आल्याने या हद्दपार आरोपीस अटक करून आरोपी विरुद्ध मपोका कलम 142,अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचे नाव मो शाहिद मो एजाज अन्सारी वय 36 वर्षे रा वारीसपुरा कामठी असे आहे. ही घटना गतरात्री दहा दरम्यान घडली.
ही यशस्वी कारवाही पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड,एसीपी संतोष खांडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, दुय्यम पोलीस निरीक्षक गड्डीमे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, सहाय्यक फौजदार संजय पिल्ले, संतोषसिंग ठाकूर, निलेश यादव, अतुल राठोड, अनुप अढाऊ,उपेंद्र आकोटकर, रोशन डाखोरे, पोलीस शिपाई कुंदन आदींनी केली.