दूध अनुदान योजनेत सहभागी होण्यासाठी 10 मार्च पर्यंत मुदतवाढ

नागपूर :- राज्यातील खाजगी व सहकारी दूध प्रकल्पांना गायीच्या दुधाचा पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना थेट अनुदानाचा लाभ देणारी योजना 10 फेब्रुवारी पर्यंत राबविण्यात आली होती. परंतु शासनाने या योजनेला दि 10 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

संकलित होणाऱ्या दूधासाठी उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेसाठी बँकेमार्फत प्रकल्पांना विशेष सॉफ्टवेअर उपलब्ध करुन देण्यात आले असून दूध उत्पादकांनी त्यांच्या दुभत्या जनावरांची माहिती या पोर्टलवर सादर करणे आवश्यक‍ आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी प्रादेशिक किंवा जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नागपुरचे प्रादेशिक दुग्धव्यवसाय अधिकारी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सरसकट जुनी पेंशन योजना लागू करा - आमदार सुधाकर अडबाले यांची राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

Tue Feb 27 , 2024
नागपूर :- दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व १ नोव्हेंबर २००५ नंतर टप्याटप्याने १०० टक्के अनुदानावर आलेल्या राज्यभरातील शाळांमधील सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना व १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त राज्यातील सर्व शिक्षक – कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडे आमदार सुधाकर अडबाले यांनी भेट घेत केली. २०२४ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights