जिवानीशी ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीतांना अटक

मौदा :- मौदा अंतर्गत धानला शिवार येथे दि. २१/०६/२०२४ चे ०९.३० वा. दरम्यान फिर्यादी नामे लता कवडु कारेमोरे वय ४४ वर्ष रा. वार्ड क्र. ४ धानला ता. मौदा जि. नागपूर यांची बहीन सुनिता मारोती वेदय वय ५४ वर्ष हिला वडीलांनी १ एकर शेती यावर्षी स्वतः वाहायची होती त्याकरीता यातील आरोपी भाउ यास बोलली होती परंतु भाउ धनराज मारोती वैद्य, वय ५८ वर्ष यास तिला ती शेती दयायची नसल्याने तिचे सोबत वादविवाद करीत होता. व दि. २१/०६/२०२४ से सकाळी ०९.३० वा. याच कारणा वरून भाऊ आरोपी क्र. १) धनराज वैदय व त्याचा मूलगा २) ओमदास धनराज वैदय दोन्ही रा. भानला ता. मौदा जि. नागपूर यांनी बहीन सुनिता सोबत झगडा भांडण करून तिचा जिव घेण्याचे उ‌द्देशाने तिचे डोक्यावर काडीने मारले व रक्तबंबाळ झाली व शरीरावर लाथा बुक्यांनी मारून गंभीर जखमी केलेले आहे. जखमीचा वैद्यकीय उपचार सुरू आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रीपोर्ट वरून आरोपीविरूद्ध पोस्टे मौदा येथे कलम ३०७, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला असुन यातील दोन्ही आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि मनोज चौधरी हे करीत आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर प्रमीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे मौदा येथील ठाणेदार सतिशसिंग राजपूत, सपोनि मनोज बौधरी व स्टाफ यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खोटया कागदपत्रांच्या आधारे टेंडर मिळवुन शासनाला बनावट औषधींचा पुरवठा करणारा आरोपी कळमेश्वर पोलीसांच्या अटकेत

Mon Jun 24 , 2024
नागपूर :- दिनांक ०६/०२/२०२३ रोजी औषध निरीक्षक नितीन पद्‌माकर भांडारकर हे अन्न व औषधी प्रशासन विभाग नागपुर यांनी ग्रामीण रूग्णालय कळमेश्वर येथे मेडीसीन पडताळणी करीता भेट दिली असता त्यांना Recip-500 Tablets, B.No. LC-44, Mfg dt. 10/2022, Exp. Dt. 09/2024, Mfd. by M/s. Refant Pharma Pvt. Ltd., Plot No. L-89, MIDC, Kerala-364135 ही औषध बनावट असल्याचा संशय आल्याने त्यांनी सदर औषधीना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!