खापा :- पो.स्टे. खापा अंतर्गत २२ कि.मी. अंतरावर मौजा महारकुंड शिवार येथे दिनांक १४/०५/२०२३ चे १९/०० वा. दरम्यान यातील महारकूड ता. सावनेर येथील अँडव्होकेट नितीन वैद्य यांचे शेतात फिर्यादी नामे निखील संजय भांडेकर वय २७ वर्ष रा. वार्ड क्र २ बेडाखेडी ता सेलू जि. वर्धा हे हजर असतांना जखमी मित्र नामे राजन दिपक चौरासे, वय २१ वर्ष रा. बोकास व आरोपी नामे- पुरुषोत्तम लेखराम कुदावळे, वय ६० वर्ष रा. बोखारा हे एकमेकांशी मजाक करीत असतांना एकमेकांशी भांडण करून भांडणामध्ये जखमी राजन दिपक चौरासे याने आरोपीस गालावर थापड मारल्याने आरोपीला राग आल्याने त्याने बाजूला असलेली लाकडी काठी उचलून “तुला आता खतम करतो” असे बोलून दोन्ही हाताने काठीने जिवंत ठार मारण्याच्या उददेशाने जखमी राजन दिपक चौरासे याचे डोक्यावर मारून त्याला गंभीर जखमी करून जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. खापा येथे आरोपीविरुध्द कलम ३०७, ५०४, ५०६ भादवि. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि बोरकर पोलीस स्टेशन खापा हे करीत आहे.