रामटेक :- अंतर्गत वाहीटोला ता. रामटेक जि. नागपुर येथे दिनांक १५/०५/२०२३ चे १६.४८ वा. ते १८.. ३० वा. दरम्यान पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ यांना गुप्त बातमी दाराने माहीती दिली की यातील आरोपी नामे राजकुमार गनेश कठौते वय ४० वर्ष, रा. वाहीटोला ता. रामटेक हा आपल्या ताब्यात अवैध्यरित्या लोखंडी हत्यार वापरतो अशा माहीतीवरून सदर इसमाच्या घरी जावुन पंचा समक्ष त्याची व त्याच्या घराची घरझडती घेतली असता त्याच्या घराच्या रूमच्या सज्जावर एक लोखंडी जुन्या बनावटीची गुप्ती किंमती अंदाजे २०० /- रूची मिळुन आल्याने सदर गुप्ती बाबत आरोपीने समाधान कारक उत्तरे न दिल्याने आरोपी विरुध्द सदर गुन्हा नोंद करण्यात आला. सदर प्रकरणी सरकार तर्फे पोलीस नायक व नं. १८४० अमोल इंगोले पोस्टे रामटेक यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. रामटेक येथे आरोपीविरुद्ध कलम ४ २५ शस्त्र कायदा १९५९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीला सूचनापत्रावर रिहा करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नायक प्रफुल रंबई हे करीत आहे.