नागपूर :-पो.स्टे. एमआयडीसी बुट्टीबोरी फिर्यादी नामे पुजा किशोर सोयाम वय २३ वर्ष रा. गणेशपुर ता. सिंदेवाही जि. चंद्रपुर है. मु. गणेशपुरा ता. हिंगणा जि. नागपुर यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. एमआयडीसी बुट्टीबोरी येथे अप. क्र. ७३/२१ कलम ३०२, ३०९ भादंवी कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
यातील आरोपी नामे किशोर सुखदेव सोयाम वय २६ वर्ष, रा. गणेशपुर ता. सिंदेवाही जि. चंद्रपुर ह.मु. गणेशपुरा ता. हिगणा जि. नागपुर हा फिर्यादी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेउन तिला नेहमी मारहाण करत असे. आरोपी हा वारंवार फिर्यादीकडे पैसे मागत होता व पैसे दिले नाही तर हातात बाकु घेउन त्यांच्या दोन वर्षाच्या मुलीला मारून टाकेल अशी धमकी देत होता. फिर्यादीने त्याच्याकडुन दोन वेळा चाकु हिसकावून घेतला होता. दिनांक ०१/०३/२०२१ चे १९/३० वा. दरम्यान आरोपीस कोणीतरी समजावेल म्हणुन गावातील लोकांना सांगण्याकरीता फिर्यादी घराबाहेर गेली असता आरोपीने रागाचे भरात आपले स्वतःच्या २ वर्ष वयाच्या लहान मुलगी मृतक नामे- राधिका किशोर सोयाम वय २ वर्ष रा. गणेशपुरा ता. हिंगणा जि. नागपूर हिचा दाढी करण्याचे ब्लेडने गळा कापुन खुन केला तसेच लोक गोळा झाल्यानंतर स्वतःचा गळा कापुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सदर प्रकरणाचे तपास पोनि विनोद ठाकरे पो. स्टे. एमआयडीसी बोरी यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता डिजे १ देशपांडे कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक २८/०८/२०२४ रोजी मा. मा. डिजे १ देशपांडे यांनी वरील नमुद आरोपीला गुन्हयात कलम ३०२ भादवी मध्ये आजिवन कारावास व ५०००/-रू. दंड, दंड न भरल्यास ५ महीने कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारचे वतीने एपीपी तपासे सा. यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन सफौ अनिल व्यवहारे यांनी मदत केली आहे.