जिवानीशी ठार करणाऱ्या आरोपीला कोर्टातुन शिक्षा

नागपूर :- पो.स्टे. एमआयडीसी बोरी फिर्यादी नामे पोहवा शैलेद्र नागरे पो.स्टे. एमआयडीसी बोरी यांच्या रिपोर्ट वरुन पो. स्टे. एमआयडीसी बोरी येथे अप. क्र. ३६३/२० कलम ३०२, १७७, २०१ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.

यातील आरोपी नामे दिनेश छेटीलाल पाल वय ३० वर्ष रा. चुरहर जि. सिंधी (मध्य प्रदेश) व मृतक नामे- सुषमा दिनेश पाल वय २८ वर्ष रा. बुरहर जि. सिंधी (मध्य प्रदेश) हे पती पत्नी असुन यातील आरोपी याने पोलीस ठाणे एमआयडीसी बोरी येथे येवुन तकार दिली की त्याचे पत्नी मृतक हिला हार्ट अटॅक आल्याने मरण पावली आहे. यावरून पो.स्टे. ला मर्ग क्र. ३७/२० कलम १७४ जाफौ दाखल करण्यात आला. मर्ग चौकशी दरम्यान आरोपीनेच घरगुती कारणावरून मृतक हिचे गळा दाबुन खुन केल्याचे निष्पन्न झालेवरून गुन्हा नोंद केला होता.

सदर प्रकरणाचे तपास तत्कालीन पोउपनि डी. आर. दराडे साो. यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. डी. जे. ०५ कनकदंडे कोर्टामध्ये सादर केले. दिनाक १८/०३/२०२४ रोजी मा. डी. जे. ०५ कनकदंडे यांनी वरील नमुद आरोगीला कलम ३०२ भादंति मध्ये आजीवन कारावास व २०००/-रू. दंड दंड न भरल्यास २ महीने साभा कारावास तसेन कलम १७७ भादंती मध्ये ०३ महिने सथम कारावास त १०००/- रु. दंड दंड न भरल्यास १ महीने कारावास. कलम २०१ भादंती मध्ये ०१ वर्ष सश्रम कारावास व १०००/- रु. दंड देह न भरल्यास १ महीने कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.

सरकारचे वतीने एपीपी मोटघरे यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन सहायक फौजदार अनिल व्यवहारे पो स्टे एमआयडीसी बोरी यांनी मदत केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तलवारीने केक कापुन वाढदिवस साजरा करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

Wed Mar 20 , 2024
उमरेड :- दिनांक १७/०३/२०२४ रोजी गोपनीय माहीती मिळाली की, राहील मोहनिकर नावाच्या युवकाने त्याचा वाढदिवसाचा केक तलवारीने कापुन साजरा केला आहे. अश्या विश्वसनीय माहीती वरून आरोपी नामे राहील गजानन मोहनिकर वय १९ वर्ष, रा. कावरापेठ उमरेड याच्या राहत्या घरी जाउन त्याच्या घराची घरझडती घेतली असता त्याचे घरातुन एक प्राणघातक शस्त्र तलवार जप्त करण्यात आली. जप्त तलवारीसह व नमुद आरोपीला ताब्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!