उमरेड :- दिनांक १७/०३/२०२४ रोजी गोपनीय माहीती मिळाली की, राहील मोहनिकर नावाच्या युवकाने त्याचा वाढदिवसाचा केक तलवारीने कापुन साजरा केला आहे. अश्या विश्वसनीय माहीती वरून आरोपी नामे राहील गजानन मोहनिकर वय १९ वर्ष, रा. कावरापेठ उमरेड याच्या राहत्या घरी जाउन त्याच्या घराची घरझडती घेतली असता त्याचे घरातुन एक प्राणघातक शस्त्र तलवार जप्त करण्यात आली. जप्त तलवारीसह व नमुद आरोपीला ताब्यात घेवून पोलीस नाईक पंकज बड्डे यांचे लेखी रीपोर्ट वरून आरोपी विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पो. हवा. राधेश्याम कांबळे हे करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार उमरेड विभाग उमरेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे, पोलीस हवालदार प्रदिप चवरे, राधेश्याम कांबळे, पोलीस नाईक पंकज बड्डे, पोलीस अमंलदार गोवर्धन शहारे, उमेश बान्ते, म.पो.शि. सुषमा भोयर पोस्टे उमरेड (ना.ग्रा.) यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.